गणेशोत्सवानिमित्त बुलडाणा डाक विभागातर्फे २१ सप्टेंबरला “गणपती नाईट कॅम्प; एकाच छताखाली मिळणार विविध सेवा
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात नागरिकांना
डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि टपाल सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी बुलडाणा
डाक विभागातर्फे येत्या २१ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष “गणपती नाईट कॅम्प”चे आयोजन करण्यात आले
आहे. सणाच्या काळात नागरिकांपर्यंत थेट पोहोचून त्यांना डाक विभागाच्या आधुनिक व डिजिटल
सुविधांची माहिती देणे आणि मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कॅम्पमधील प्रमुख सेवा आणि आकर्षणे : या नाईट
कॅम्पमध्ये नागरिकांना एकाच छताखाली पुढील सेवा उपलब्ध असणार आहेत.
टपाल व पार्सल सेवा: स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड
पोस्ट, पार्सल बुकिंग आणि आंतरराष्ट्रीय टपाल सेवा.
विमा व बचत योजना: 'पीएलआय' (PLI), 'आरपीएलआय'
(RPLI) विमा सेवा आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक (POSB) खाती.
आधार व इतर सेवा: काही नियुक्त केंद्रांवर
आधार नोंदणी व दुरुस्ती संबंधित सुविधा.
डिजिटल सुविधा: युपीआय (UPI) द्वारे विमा प्रीमियम
भरण्याची सोय व डिजिटल बँकिंगचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक.
कॅम्पच्या ठिकाणी डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित राहून नागरिकांच्या शंकांचे निरसन करतील आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करतील.
कॅम्पचे नियोजन:- दिनांक: सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ वेळ: सायंकाळी ०७:३० ते रात्री ११:३०
ठिकाणे:- श्री गणेश मित्र मंडळ, अंढेरा (ता.
चिखली), वंदेमातरम गणेशोत्सव मंडळ, खामगाव
या विशेष उपक्रमाचा लाभ सर्व नागरिक, कुटुंबे,
महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच छोट्या व्यावसायिकांनी मोठ्या
संख्येने घ्यावा, असे आवाहन बुलडाणा डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment