मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत; एसआयआर अंतर्गत नमुना ६, ७ व ८ द्वारे अर्ज करण्याची संधी

 

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत;

एसआयआर अंतर्गत नमुना ६, ७ व ८ द्वारे अर्ज करण्याची संधी

 

बुलढाणा, दि. १० (जिमाका) : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR-2026) अंतर्गत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या याद्यांच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

नवमतदार तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांना त्यांच्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणाहून नमुना-६ व घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी आहे. मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना-७, तर नावातील दुरुस्ती, मतदार ओळखपत्र बदलणे किंवा दिव्यांग चिन्हांकनासाठी नमुना-८ द्वारे अर्ज करता येणार आहे. मतदारसंघांतर्गत किंवा मतदारसंघाबाहेर स्थलांतर झाल्यामुळे पत्ता बदलण्यासाठीही नमुना-८ उपलब्ध आहे.


            दावे-हरकती दाखल केल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून त्याबाबत सूचना फलकावर प्रसिद्धी करण्यात येते. त्यानंतर सात दिवसांच्या कालावधीनंतर संबंधित प्रकरणांवर निर्णय घेतला जातो. SIR-2026 मधील दावे व हरकतींच्या नमुना-६, ७ व ८ नुसार अर्जांच्या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरील
Claims and Objections during SIR-2026 या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

दरम्यान, मतदार यादीच्या पुनरिक्षणासंदर्भात चुकीचे विधान किंवा खोटी घोषणा करणाऱ्या व्यक्तीस लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या