स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९३ वी जयंती जिल्हा कार्यालयात साजरी करण्याचे निर्देश
बुलढाणा, दि. 24 (जिमाका) : स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९३ वी जयंती २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील
सर्व जिल्हा कार्यालयांमध्ये साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास महामंडळाच्या
विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना निमंत्रित करण्यात यावे. कार्यक्रमात स्व.
अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात यावे. तसेच
त्यांनी केलेले सामाजिक कार्य, माथाडी कामगार चळवळीतील योगदान आणि आर्थिकदृष्ट्या मागास
घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात यावी.
प्रत्येक जिल्हा समन्वयकाने संबंधित
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कार्यक्रमाची प्रसिद्धी स्थानिक वृत्तपत्रांमधून
करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती,
तालुकानिहाय लाभार्थी संख्या तसेच वितरित करण्यात आलेल्या व्याज परताव्याची रक्कम याबाबतची
माहिती प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन काटेकोर नियोजन व
योग्य पद्धतीने करण्यात यावे. कार्यक्रमानंतर छायाचित्रे, प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची
वृत्तपत्र कात्रणे, लाभार्थ्यांची माहिती तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा संक्षिप्त
अहवाल संबंधित विभागीय समन्वयकांमार्फत महामंडळाच्या मुख्यालयास ई-मेलद्वारे सादर करण्याचेही
निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा समन्वयकांनी कार्यक्रम उत्साहपूर्ण
वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी
समन्वय राहील याची खात्री करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment