गुरुवारी (१ ऑक्टोंबर) डाक अदालत

 


बुलढाणा, दि. २८ (जिमाका) : टपाल सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करण्यासाठी बुलढाणा डाक विभागाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. अधीक्षक डाकघर, बुलढाणा विभाग, बुलढाणा यांच्या कार्यालयात ही डाक अदालत होणार आहे. पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबाबतच्या ज्या तक्रारींचे निवारण अद्याप झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारी डाक अदालतीमध्ये दाखल करता येणार आहेत.

विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर यांसंबंधीच्या तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार केला जाणार आहे. तक्रारदारांनी तक्रारीचा संपूर्ण तपशील, संबंधित कागदपत्रे तसेच यापूर्वी तक्रार पाठविली असल्यास तिचा संदर्भ नमूद करावा.

तक्रारदारांनी आपली तक्रार गजेंद्र ना. जाधव, अधीक्षक डाकघर, बुलढाणा विभाग, बुलढाणा-४४३००१ यांच्या नावे दोन प्रतींमध्ये दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रीतीने प्रत्यक्ष अथवा टपालाद्वारे पाठवावी. तक्रारी spbldn.mah@gmail.com या ई-मेलवरही पाठविता येतील. डाक सेवेबाबतच्या प्रलंबित तक्रारींचे जलद व समाधानकारक निराकरण करण्यासाठी नागरिकांनी या डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलढाणा विभागाचे अधीक्षक डाकघर गजेंद्र ना. जाधव यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर