सेवा संकल्प अभियान ; AI आधारित ‘SCANO’ तंत्रज्ञानाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी केली आरोग्य तपासणी नागरिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन

 





बुलढाणा, दि. २८ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा तसेच आधुनिक आरोग्य तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी उपलब्ध झालेल्या AI आधारित ‘SCANO’ रोबोटिक मशीनद्वारे स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. आरोग्यविषयक समस्या वेळीच निदर्शनास आल्यास त्यावर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

AI आधारित SCANO तंत्रज्ञानामुळे आधुनिक पद्धतीने आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली असून, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर