बुलढाण्यात २९ सप्टेंबरला 'रोजगार महाकुंभ'; जिल्ह्यातील १३ ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन
बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या
जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'रोजगार महाकुंभ महाराष्ट्र' अंतर्गत एकाच
दिवशी तब्बल १३ ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले
आहे. हे मेळावे २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने या भव्य मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विविध
आस्थापना आणि कंपन्यांमधील रिक्त पदांवर स्थानिक तरुणांना थेट रोजगाराची संधी मिळावी,
हा यामागील मुख्य उद्देश आहे.
मेळाव्याची
प्रमुख वैशिष्ट्ये
* थेट मुलाखत: शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार उमेदवारांना
नामांकित आस्थापनांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल.
•विनामूल्य सॉफ्ट स्किल प्रशिक्षण: उमेदवारांना
मुलाखतीची तयारी आणि रिझ्युमे (Resume) कसा बनवावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी २१
ते २४ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक तालुक्यातील शासकीय आयटीआय (ITI) येथे मोफत प्रशिक्षण
आयोजित केले आहे.
जिल्ह्यातील १३ ठिकाणे : पुंडलीक महाराज महाविद्यालय नांदुरा, KBJ ITI बोराखेडी
मोताळा, राजमाता पॅरामेडिकल कॉलेज सिंदखेड राजा, मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा, श्री
शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली, एमईएस कला आणि वाणिज्य महाविद्यालय मेहकर,भगवान
बाबा महाविद्यालय लोणार, जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
महाविद्यालय जळगाव जामोद, शासकीय पॉलिटेक्निक खामगाव, सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस
खामगाव, सरस्वती कॉलेज शेगाव, श्री व्यंकटेश कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय
देऊळगाव राजा.
या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या
जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या व इतर आस्थापनांनी आपल्याकडील रिक्त पदांची माहिती विहित
नमुन्यात सादर करावी. तसेच, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी पूर्व-प्रशिक्षणाचा
लाभ घेऊन २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment