सेवा संकल्प अभियानांतर्गत देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा; नवीन नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावतीकरणाची सुविधा; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 29 (जिमाका) :
सेवासंकल्प अभियानांतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी देऊळगाव
राजा पोस्ट ऑफिस येथे आधार नोंदणी तसेच आधारमधील दुरुस्ती व अद्ययावतीकरणाची सेवा उपलब्ध
करून देण्यात आली आहे. त्यामुळे देऊळगाव राजा व परिसरातील नागरिकांना आधारशी संबंधित
विविध कामांसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा मिळणार आहे.
देऊळगाव राजा पोस्ट ऑफिसमधील आधार सेवा
केंद्राची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत राहणार आहे. या केंद्रावर नवीन आधार
नोंदणी, आधारमधील आवश्यक दुरुस्ती तसेच अद्ययावतीकरणाची कामे करता येणार आहेत. आधारशी
संबंधित सेवांसाठी नागरिकांना दूरवर जावे लागू नये आणि स्थानिक पातळीवर सुलभ व सुविधाजनक
सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक
कागदपत्रांसह देऊळगाव राजा पोस्ट ऑफिस येथे उपस्थित राहून आधार सेवेचा लाभ घ्यावा,
असे आवाहन बुलढाणा विभाग अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
0000

Comments
Post a Comment