भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करावेत

 


 

बुलढाणा, दि. 24 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाच्या अधिनस्त अकोला, वाशिम व बुलढाणा या तीन जिल्ह्यांतील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विनाअनुदानित व मान्यता प्राप्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी MahaDBT प्रणालीवर नवीन अर्ज तसेच नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज MahaDBT पोर्टलवर भरता येणार आहेत.

 

या योजनांसाठी ११ वी, १२ वी, B.A., B.Com., B.Sc., M.A., M.Com., M.Sc., BSW, MSW, B.Lib., M.Lib., ANM, GNM, D.Ed., B.Ed., M.Ed. आदी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत. तसेच उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनाही योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 

आवश्यक कागदपत्रांमध्ये बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका तसेच संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक जात वैधता प्रमाणपत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

 

विद्यार्थ्यांनी योजनेची कार्यपद्धती व इतर माहिती जाणून घेण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरील आदिवासी विकास विभागाचा १७ जानेवारी २०२२ रोजीचा शासन निर्णय पाहावा. तसेच शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व अर्जाच्या कालमर्यादेचे पालन करावे.

MahaDBT पोर्टल : mahadbt2.maharashtra.gov.in

अर्ज व शिष्यवृत्तीबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाचे प्रकल्प अधिकारी मोहनकुमार ग. व्यवहारे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर