शिष्यवृत्ती अर्जांची महाविद्यालयांनी १५ सप्टेंबरपर्यंत पडताळणी करा
शिष्यवृत्ती अर्जांची महाविद्यालयांनी
१५ सप्टेंबरपर्यंत पडताळणी करा
बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : इतर
मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांची महाविद्यालय स्तरावरून
तात्काळ पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५
आणि २०२५-२६ मधील प्रलंबित (Pending) व परत पाठवलेले (Sent-back) अर्ज निकाली काढण्यासाठी
MahaDBT 1.0 हे पोर्टल १५ सप्टेंबर २०२६ पर्यंतच सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक
संचालक दत्तात्रय वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या
कालावधीत MahaDBT 1.0 पोर्टलवर शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व २०२६-२७ साठी कोणतेही नवीन
अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. हे पोर्टल केवळ मागील वर्षांचे प्रलंबित अर्ज मार्गी लावण्यासाठीच
वापरले जाईल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व २०२६-२७ चे नवीन अर्ज MahaDBT 2.0 पोर्टलवर स्वीकारले
जातील. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये जे अर्ज नाकारले (Rejected) गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना
आवश्यकतेनुसार MahaDBT 1.0 पोर्टलद्वारे पुन्हा अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली
आहे. संबंधित महाविद्यालयांना त्यांच्या सध्याच्या जुन्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा
(Credentials) वापर करून MahaDBT 1.0 पोर्टलवर काम करता येईल.
सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्याचे
निर्देश
विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीचा दुसरा हप्ता वेळेत मिळण्यासाठी महाविद्यालयांनी प्रलंबित, नाकारलेले
व परत पाठवलेले सर्व अर्ज १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्राधान्याने निकाली काढणे बंधनकारक
आहे. अर्जांची संख्या व कालमर्यादा विचारात घेता, सुट्टीच्या दिवशीसुद्धा शिष्यवृत्तीचे
काम सुरू ठेवून विशेष कॅम्प आयोजित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
MahaDBT
1.0 हे पोर्टल १५ सप्टेंबर २०२६ नंतर कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध असणार नाही आणि यापुढे
कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. वेळेत पडताळणी न झाल्यामुळे अर्ज प्रलंबित राहिल्यास
अथवा भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास त्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य
सर्वस्वी जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. सर्व महाविद्यालयांनी
https://dbtworkflow.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तातडीने प्रलंबित अर्जांचा
निपटारा करावा, असे आवाहन सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment