विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी निरीक्षकांचा बुलढाणा दौरा निश्चित

 


 

बुलढाणा, दि. 17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये २० जून २०२६ पासून १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्तांची बुलढाणा जिल्ह्यासाठी 'मतदार यादी निरीक्षक' (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी निरीक्षकांना पुनरीक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत जिल्ह्याला एकूण तीन भेटी देणे बंधनकारक आहे. यामध्ये दावे व हरकती सादर करणे, त्यांची विल्हेवाट लावणे आणि अंतिम प्रसिद्धीपूर्वीची पडताळणी या टप्प्यांचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या दोन भेटींचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

 

पहिली भेट (First Visit): २३ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, यादरम्यान सकाळी ११:०० वाजता मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसरी भेट (Second Visit): ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

याबाबतची अधिकृत माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गौणवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर