सुलतानपूर येथे ३६ विद्यार्थिनींचे
HPV लसीकरण ; गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंधात्मक संरक्षणासाठी आरोग्य
विभागाचा उपक्रम
बुलढाणा, दि. 11 (जिमाका) :
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींना
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंधात्मक संरक्षण मिळावे, यासाठी HPV लसीकरण
मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत सुलतानपूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व
महाविद्यालय तसेच श्री सिद्धेश्वर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १४ वर्षे पूर्ण
व १५ वर्षांखालील ३६ पात्र विद्यार्थिनींचे HPV लसीकरण करण्यात आले.
या
मोहिमेत आतापर्यंत एकूण ४५४ पात्र विद्यार्थिनींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. वैभव मापारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली
तसेच डॉ. आकाश लोंढे यांच्या उपस्थितीत लसीकरण सत्र घेण्यात आले.
यावेळी
विद्यार्थिनी व पालकांना HPV लसीकरणाचे महत्त्व, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून
होणारे संरक्षण तसेच नियमित आरोग्य तपासणीबाबत जनजागृती करण्यात आली.
जिल्हा
परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त
करून आरोग्य पथकाचे अभिनंदन केले. लसीकरणाच्या यशस्वी आयोजनासाठी आघाव एच.टी., कुंटे
सिस्टर, खंडारे सिस्टर, योगिनी सरदार, आरोग्य सहाय्यक, आरोग्य निरीक्षक यांनी विशेष
सहकार्य केले.
जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले व जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरणासह विविध आरोग्यविषयक
उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
0000
Comments
Post a Comment