जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

 


बुलढाणा, दि.15 (जिमाका) : जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे नियमितपणे दर शुक्रवारी नेत्र, मतिमंद/मनोविकार तसेच कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणी करण्यात येते. मात्र, स्थानिक सुट्टी असल्यामुळे दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी होणारे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले आहे.

या दिवशी नागरिकांनी दिव्यांग तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिर रद्द असल्याची माहिती न मिळाल्याने नागरिकांना रुग्णालयात आल्यानंतर होणाऱ्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांनी कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर