क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन
बुलढाणा,
दि. २५ (जिमाका) : अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक
अध्यक्ष तथा माथाडी कामगारांचे दैवत क्रांतिसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या
९३व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बुलढाणा जिल्हा
कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या समाजहितासाठीच्या
कार्याला व संघर्षमय जीवनाला उजाळा देण्यात आला. युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी
त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श घेऊन
समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात
आला.
कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्राचे सहाय्यक आयुक्त गणेश बिटोडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे
जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम अंभोरे, वैभव मुंढे, सूरज जगताप, विविध महामंडळांचे अधिकारी,
कौशल्य विकास कार्यालयातील कर्मचारी, महामंडळाचे लाभार्थी तसेच मराठा समाजबांधव उपस्थित
होते.
0000

Comments
Post a Comment