स्वाधार योजना नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा, दि.16 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नूतनीकरणासाठी (Renewals) मुदतवाढ दिली आहे. शैक्षणिक
वर्ष २०२६-२७ साठी पात्र विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर
करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
योजनेचे
स्वरूप व पात्रता: शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असणारे परंतु जागेअभावी प्रवेश
न मिळालेले अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी. इयत्ता ११ वी, १२
वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले
विद्यार्थी.
विद्यार्थ्यांना
भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर सुविधांसाठी लागणारी रक्कम थेट
त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.
अर्ज प्रक्रियेबाबत
माहिती: पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन
पद्धतीने अर्ज भरावा. तसेच आवश्यक कागदपत्रांची यादी समाज कल्याण कार्यालयाच्या सूचना
फलकावर लावली आहे. विद्यार्थ्यांनी सर्व योग्य कागदपत्रांसह पूर्ण भरलेला अर्ज समाज
कल्याण कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी
आल्यास विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयाशी संपर्क साधावा.
00000
Comments
Post a Comment