राजूर घाटात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
बुलढाणा, दि. 23 (जिमाका) : राजूर घाट येथील हनुमान मंदिराजवळील दरीत अंदाजे ३५ ते ४० वर्षीय
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात करण्यात
आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित
व्यक्तीचा मृतदेह दरीत आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी
मर्ग क्रमांक ३७/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात
आली आहे.
मृत व्यक्तीची उंची अंदाजे ५ फूट ७ इंच
असून, त्याने आकाशी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेली आहे. शर्टवर इंग्रजीमध्ये
“DIVISION
(RAW) INDUSTRIAL DENIM” असे लिहिलेले आहे. मृत व्यक्तीचा रंग निमगोरा असून, उजव्या हाताच्या
पोटरीवर मराठीत “आई” असे
लिहिलेले आहे. तसेच उजव्या छातीवर गोंदवलेले चिन्ह असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
कमरेला काळ्या रंगाचा बेल्ट असून हाताची नखे वाढलेली आहेत. मध्यम दाढी व काळे केस अशी
त्याची शारीरिक ओळख आहे.
या वर्णनाशी जुळणारी व्यक्ती बेपत्ता असल्यास
किंवा मृताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी बुलढाणा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे
आवाहन पोलिसांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment