केंद्रीय DCS MH ॲपद्वारे खरीप ई-पीक पाहणी नोंदणी सुरू; १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पीक पाहणी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन
केंद्रीय DCS MH ॲपद्वारे खरीप ई-पीक पाहणी नोंदणी सुरू; १० नोव्हेंबर
२०२६ पर्यंत पीक पाहणी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन
बुलढाणा, दि.9 (जिमाका): बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम
२०२६-२७ साठी ‘केंद्रीय DCS MH’ (Central DCS) या नवीन मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी
व नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी १० नोव्हेंबर
२०२६ पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी गावातील नियुक्त सहाय्यकाकडून वेळेत पूर्ण करून
घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या निर्देशानुसार पीक पाहणी व नोंदणी
मोहिमेला ११ ऑगस्ट २०२६ पासून सुरुवात झाली आहे.
ही ई-पीक पाहणी अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रत्येक
गावासाठी विशेष 'पीक पाहणी सहाय्यका'ची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यात खरीप
हंगाम २०२६-२७ साठी केंद्रीय DCS MH ॲपद्वारे एकूण ८ लाख ४० हजार ९९१ पीक पाहणी करावयाच्या
मालकी (owner's) प्लॉटपैकी २ लाख ४० हजार ०६५ प्लॉटवर संबंधित सहाय्यकांमार्फत ७/१२
वर पिकांची यशस्वी नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधवांनी
आपल्या गावातील नियुक्त सहाय्यकाकडून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी करून घ्यावी,
असे आवाहन करण्यात आले आहे.
१०० टक्के ई-पीक
पाहणी नोंदणी बंधनकारक: पीक पाहणीची नोंदणी ‘केंद्रीय DCS MH’ मोबाईल ॲपद्वारे थेट
शेतावर जाऊन पिकांची नोंदणी करून माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. या सर्व्हे अंतर्गत
१०० टक्के ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगामात शेतात
उभे असलेले पीक, कायम पड अथवा चालू पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे.
पीक विमा व शासकीय
लाभासाठी अचूक नोंदणी आवश्यक : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये ई-पीक पाहणी द्वारे पिकांची
नोंदणी न केल्यास ७/१२ उताऱ्यावरील 'पीक पेरा' कोरा राहील, जो नंतर भरता येत नाही.
यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, शासकीय अनुदान व इतर विविध योजनांचे लाभ मिळण्यास अडचणी
निर्माण होऊ शकतात. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीक विम्याचा लाभ
मिळवण्यासाठी ७/१२ वर अचूक पीक नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे.
00000
Comments
Post a Comment