श्री सत्यनारायण मंदिर न्यासाबाबत ३० दिवसांत हरकती व पुरावे सादर करण्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन
श्री सत्यनारायण मंदिर न्यासाबाबत ३०
दिवसांत हरकती व पुरावे सादर करण्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन
बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : खामगाव
येथील ‘श्री सत्यनारायण मंदिर’(नोंदणी क्रमांक
A-४८४) या सार्वजनिक न्यासाला मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम
५० (अ)(१) अन्वये योजना लागू करण्याबाबत चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी कोणास काही
हरकत किंवा पुरावा सादर करावयाचा असल्यास त्यांनी ३० दिवसांच्या आत लेखी कैफियत सादर
करावी, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त-२, बुलढाणा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केले आहे.
धर्मादाय
सह आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्याकडील स्वंयखुद चौकशी अर्ज क्रमांक १९/२००९
मध्ये २९ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या आदेशानुसार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बुलढाणा
विभाग यांच्या न्यायालयात योजना अर्ज क्रमांक ४५/१३ अन्वये ही चौकशी प्रक्रिया सुरु
आहे.
सर्व
संबंधित नागरिकांना जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, या चौकशी प्रकरणात कोणास
काही हरकत घ्यावयाची असल्यास अथवा पुरावा द्यायचा असल्यास, ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या
तारखेपासून ३० दिवसांच्या आत आपली लेखी कैफियत कार्यालयीन वेळेत पोहोचेल अशा रीतीने
पाठवावी.
मुदतीनंतर
प्राप्त झालेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच निर्धारित मुदतीत कोणतीही
कैफियत न आल्यास, कोणालाही काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल व
अर्जाच्या निकालाबाबत योग्य ते कायदेशीर आदेश पारित करण्यात येतील, असेही सहाय्यक धर्मादाय
आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
00000
Comments
Post a Comment