सेवासंकल्प अभियान ; भटके-विमुक्त नागरिकांसाठी २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान विशेष मोहिम

 


 

बुलढाणा, दि.25 (जिमाका):  राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना तसेच आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

 

‘सेवासंकल्प अभियान’ व ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील भटके-विमुक्त समूहाची लोकसंख्या अधिक असलेल्या वस्त्यांमध्ये तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, तसेच आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

 

तालुकानिहाय शिबिरांचे नियोजन:

 

खामगाव : शिराळा – २७ सप्टेंबर, उमरा – २८ सप्टेंबर, मांजरी – २९ सप्टेंबर.

मोताळा : चिंचखेड नाथ – २७ सप्टेंबर, बोऱाखेडी – २८ सप्टेंबर, लपाळी – २९ सप्टेंबर.

शेगाव : शेगाव – २७ सप्टेंबर, मनसगाव – २८ सप्टेंबर, जावळा – २९ सप्टेंबर.

जळगाव जामोद : मोहितेपूर – २७ सप्टेंबर, नाव बुद्रुक – २८ सप्टेंबर, उसरा – २९ सप्टेंबर.

देऊळगाव राजा : अमृतनगर – २७ सप्टेंबर, दिग्रस – २८ सप्टेंबर, अंढेरा – २९ सप्टेंबर.

बुलढाणा : पिंपरखेड – २७ सप्टेंबर, कुंभफळ – २८ सप्टेंबर. लोणार : पांग्रा डोळे – २७ सप्टेंबर, जाबुळ – २८ सप्टेंबर.

मेहकर : मेहकर (खंडाळा वस्ती) – २७ सप्टेंबर, जानेफळ – २८ सप्टेंबर, हिवरा आश्रम – २९ सप्टेंबर.

सिंदखेड राजा : राहेरी बु. – २७ सप्टेंबर, दुसरबीड – २८ सप्टेंबर.

चिखली : घोलद – २७ सप्टेंबर, घाणमोड – २८ सप्टेंबर, तांदुळवाडी – २९ सप्टेंबर.

नांदुरा : गोसिंगा – २७ सप्टेंबर, नांदुरा – २८ सप्टेंबर.

संग्रामपूर : संग्रामपूर – २७ सप्टेंबर, वरवट बकाल – २८ सप्टेंबर, सोनाळा – २९ सप्टेंबर.

मलकापूर : धरणगाव – २७ सप्टेंबर, जांभूळ धाबा – २८ सप्टेंबर, दाताळा – २९ सप्टेंबर

 

जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर