सेवा संकल्प अभियान’अंतर्गत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष त्रुटीपूर्ती शिबिर
बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कार्यकाळाला
२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’राबविण्यात येत
आहे. या अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा यांच्या कार्यालयामार्फत
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष त्रुटीपूर्ती शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे.
सामाईक
परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर झाला असून, उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी
प्रवेश निश्चित करण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच इयत्ता ११ वी व
१२ वी विज्ञान शाखेतील नवीन प्रवेशित विद्यार्थी आणि डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी
जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर केले नसल्यास, त्यांच्यासाठी अर्ज स्वीकृतीची
विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या
विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थी,
सेवा, निवडणूक व इतर प्रकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी
विशेष कार्यवाही करण्यात येणार आहे. त्रुटी असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील तसेच
इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखा आणि डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना
प्रकरणांची पूर्तता करण्याबाबत ई-मेल, एसएमएस व पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
या
‘सेवा संकल्प अभियान’ विशेष मोहिमेचा सर्व संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बुलढाणा यांचे अध्यक्ष नरेंद्र फुलझले, उपायुक्त
तथा सदस्य माया केदार तसेच संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment