गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान ; आजपासून खामगाव तालुक्यातून उपक्रमास सुरुवात


गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान ; आजपासून खामगाव तालुक्यातून उपक्रमास सुरुवात


 बुलढाणा, दि. 17 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय बुलढाणा आजपासून ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील जगदंबा क्रीडा व्यायाम प्रसारक व बहुद्देशीय मंडळ येथून प्रारंभ करीत आहे.
 
         राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, या प्रमुख उद्देशाने राज्यभर ‘लोकसंवाद 2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम 17 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. 
     
       जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील जगदंबा क्रीडा व्यायाम प्रसारक व बहुद्देशीय मंडळापासून होत आहे. या मंडळात आज 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील जगदंबा क्रीडा व्यायाम प्रसारक व बहुद्देशीय मंडळाच्या ठिकाणी कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
000000
  

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर