विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मंडळनिहाय शिबीरांचे आयोजन
बुलढाणा, दि.16 (जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या
विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी दि. १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर
२०२६ या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरांच्या
माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचा लाभ
एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
महसूल विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण
विभागामार्फत नियुक्त तालुका व जिल्हा स्तरावरील अशासकीय सदस्यांच्या सहकार्याने ही
शिबीरे मंडळ व तालुका स्तरावर आयोजित केली जात आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वंचित
घटकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणे हा आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील
जास्तीत जास्त नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी या शिबीरांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी
होऊन विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'इतर मागास बहुजन
कल्याण, बुलढाणा' चे सहाय्यक संचालक दत्तात्रय वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले
आहे.
00000
Comments
Post a Comment