सेवा संकल्प अभियान; ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ उपक्रमांतर्गत एकलारा बानोदा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ३० वर्षांवरील नागरिकांची बीपी, मधुमेह व कर्करोगाची तपासणी; ज्येष्ठ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी

 



 

बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या उपक्रमाच्या माध्यमातून आयुष्यमान आरोग्य मंदिर, एकलारा बानोदा येथे ३० वर्षांवरील नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

शिबिरात ३० वर्षांवरील महिला व पुरुषांची उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांसाठी (NCD) तपासणी करण्यात आली. वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या आजारांचे वेळीच निदान होऊन आवश्यक उपचार सुरू करता यावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

तसेच ३० वर्षांवरील नागरिकांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची ‘एचडी’ अंतर्गत विशेष तपासणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय पथकाने नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैली तसेच आजारांवर वेळीच नियंत्रण ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

तपासणीदरम्यान उपचाराची आवश्यकता असलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी योग्य सल्ला देण्यात आला तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान व उपचार करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर