महाडीबीटीवर कापूस श्रेडर बाबीसाठी लाभ घेण्याचे आवाहन

 

महाडीबीटीवर कापूस श्रेडर बाबीसाठी लाभ घेण्याचे आवाहन

बुलढाणा जिल्ह्यासाठी 112 कापूस श्रेडरचे लक्षांक; पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा

 

बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : केंद्र शासनाच्या सन 2026-27  करिता पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कापूस क्रांती) (MCP)’ या नव्या अभियानाला शासनाकडून पाच वर्षांकरिता मान्यता देण्यात आली आहे. या अभियानांतर्गत यांत्रिकीकरणास चालना देण्यासाठी ‘कापूस श्रेडर या घटकाचा समावेश करण्यात आला आहे.

 

या घटकाची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) या योजनेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांना लाभ घेता येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण 112  कापूस श्रेडरचे लक्षांक तालुकानिहाय देण्यात आले आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 50 टक्के कमाल 75 हजार रुपये प्रति युनिट, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के कमाल 60 हजार रुपये प्रति युनिट अनुदान अनुज्ञेय आहे.

 

महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यांस प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकरी व संबंधित संस्थांनी महाडीबीटीच्या Farmer/Agrilogin (https://mahadbt.maharashtra.gov.in) ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष डावरे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या