अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी
पोलिसांचे आवाहन
बुलढाणा,
दि. 3 (जिमाका): बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम नांद्राकोळी
शिवारातील पैनगंगा नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष आढळून आले आहे. सदर इसमाचे ओळख
पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
पोलीसांकडून
मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टे बुलढाणा ग्रामीण येथे मर्ग क्र. ४२/२०२६ कलम १९४
बीएनएसएस (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे. रंग सावाळा, चेहरा गोल, डोक्यावर काळे पांढरे
मध्यम केस, दाढी काळी पाढरी मध्यम असलेली. उजव्या हाताचे मनगटावर लाल रंगाची राखी
बांधलेली, बांधा मध्यम उंची अंदाजे पाच फुट, अंगात पांढऱ्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट,
पांढऱ्या रंगाचे बनीयन, काळा रंगाची फुल पॅन्ट असलेला इसमाला सामान्य रुग्णालय
बुलढाणा येथील प्रेत शितगृहात ठेवले आहे.
मृत व्यक्तीची
अद्याप ओळख पटलेली नसून, त्याचा फोटो व वर्णनाच्या आधारे शोध सुरू आहे. सदर
व्यक्ती आपल्या परिसरातून हरवलेली असल्याची माहिती कोणाकडे असल्यास किंवा संबंधित
व्यक्तीची ओळख पटत असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे संपर्क
साधावा, असे आवाहन पोलिस उपनिरिक्षक समाधान वडणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण ०७२६२-२४१२५५, पोलीस निरीक्षक आशिष रोही ९६०७३०८२२४, पोउपनी
समाधान वढणे ८७६६५३७३९२ तसेच, नागरिकांनी ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
0000

Comments
Post a Comment