इयत्ता नववी व अकरावीसाठी LEST-2027 परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सुरू; 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले

 इयत्ता नववी व अकरावीसाठी LEST-2027 परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सुरू;

30 सप्टेंबर पर्यंत अर्ज मागविले

 

बुलढाणा, दि. ४ (जिमाका): शैक्षणिक सत्र २०२७-२८ साठी इयत्ता नववी व अकरावीमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या Lateral Entry Selection Test (LEST)-2027 परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. प्रवेशासाठी इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित ऑनलाइन पोर्टलवर जाऊन विनामूल्य ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे.

 

इयत्ता नववीसाठी cbseitms.nic.in/2026/nvsix_9 आणि इयत्ता अकरावीसाठी cbseitms.nic.in/2026/nvsxi_11 या लिंकवर ऑनलाइन नोंदणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी माहितीपत्रकातील पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच इतर सूचनांचा काळजीपूर्वक अभ्यास करून विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयचे प्राचार्य के. डी. धोपटे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या