मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन पदांसाठी अर्ज मागविले

 

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन पदांसाठी अर्ज मागविले

 

बुलढाणा, दि. ७ (जिमाका): सेवागिरी बाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोताळा, जि. बुलढाणा येथे तासिका तत्त्वावर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक विषय शिकविण्यासाठी शिल्प निदेशकांची दोन पदे भरण्यात येणार आहेत. पात्र शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) या पदाचे एक आणि तारतंत्री (वायरमन) या पदाचे एक पद रिक्त आहे.

 

COPA पदासाठी संगणकशास्त्र/आयटीमधील बी.व्होक. किंवा पदवी, संगणकशास्त्र/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/आयटीमधील पदव्युत्तर पदवी, बी.व्होक./पदवीसोबत पीजीडीसीए, मान्यताप्राप्त संस्थेचा संगणकशास्त्र/आयटीमधील तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा DGTचा संबंधित अॅडव्हान्स्ड डिप्लोमा, तसेच NTC/NAC + CITS in COPA यापैकी पात्रता आवश्यक आहे.

 

तारतंत्री (वायरमन) पदासाठी विद्युत/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीतील बी.व्होक./पदवी, AICTE मान्यताप्राप्त संस्थेचा तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा DGTचा संबंधित अॅडव्हान्स्ड डिप्लोमा अथवा वायरमन ट्रेडमधील NTC/NAC + CITS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज शासकीय आयटीआय, मोताळा, जि. बुलढाणा येथे १० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्यक्ष सादर करावा. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.

 

पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी/मुलाखत १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आवश्यकतेनुसार घेण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी स्वतंत्र पत्र पाठविले जाणार नसून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता मिळणार नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. भर्ती/मुलाखत प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार पदभरती प्रक्रिया समितीकडे राखून ठेवण्यात आला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या