केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा जिल्हा दौरा
बुलढाणा, दि. ४ (जिमाका): केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव हे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध कार्यक्रम व पीक पाहणीला उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मेहकर येथून संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे रवाना होतील. सकाळी ११ वाजता पळशी झाशी येथे आगमन झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत महंत श्री शंकरगिरी महाराज संस्थान येथे भक्त निवास व प्रसादालय बांधकामाचे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी १२.३० वाजता शेगाव येथे आगमन करून कृष्णा कॉटेज, खामगाव रोड येथे राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ च्या उद्घाटन सोहळ्यास ते उपस्थिती.
दुपारी १.३० वाजता अटाळी, ता. खामगाव येथे भेट देऊन पावसाअभावी सुकत असलेल्या पिकांची पाहणी करतील. दुपारी २ वाजता बोरी अडगाव, २.३० वाजता शहापूर आणि ३.३० वाजता शिळी नेमाने येथे भेट देऊन पावसाअभावी सुकलेल्या पिकांची पाहणी. सायंकाळी ५.३० वाजता चिखली येथे आगमन व भव्य महा दहीहंडी-२०२६ सोहळ्यास उपस्थिती. त्यानंतर सोयीनुसार मेहकरकडे प्रयाण करतील.
0000
Comments
Post a Comment