१० सप्टेंबरला बुलढाण्यात ‘पेंशन अदालत’; निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घेण्याचे आवाहन
१० सप्टेंबरला बुलढाण्यात
‘पेंशन अदालत’; निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलढाणा, दि.8 (जिमाका): महालेखापाल नागपूर तसेच जिल्हा कोषागार
कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारक, कुटुंब
निवृत्तीवेतन धारक आणि आहरण व संवितरण अधिकारी यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी
विशेष ‘पेंशन अदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे.
ही पेंशन अदालत गुरुवार, दिनांक १० सप्टेंबर २०२६
रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
येथे पार पडणार आहे. या अदालतीमध्ये निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडीअडचणी व तक्रारींचे
तात्काळ निवारण केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन
धारकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार
कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment