Thursday 6 July 2023

DIO BULDANA NEWS 05.07.2023

 --गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत अनुदान मागणीसाठी अर्ज आमंत्रित

बुलढाणा, दि‍.05 :-  राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुरु असलेली गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही सुधारीत योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असुन तसेच राज्यातील ज्या तालुक्यातील गोशाळांना यापुर्वी अनुदान वितरीत केलेले आहे ते वगळुन प्रत्येक तालुक्यातुन एक याप्रमाणे सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेसाठी पात्र गोशाळाकडुन नव्याने अर्ज् मागविण्यात येत आहेत.

यामध्ये जनावरांच्या संख्येवर अनुदान देण्यात येणार आहे.कामास उपयुक्त्‍ नसलेल्या व असलेल्या गायवळु व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे अशा पशुधनासाठी चारा पाणी व निवारा यासाठी सोय उपलब्ध करुन देणे गोवर्धन गोवंश सेवा केंद्रातील पशुधनासाठी  आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण विकास कार्यक्रम राबविणे,गोमुत्र शेणापासुन विविध उत्पादने खत गोबरगॅस व इतर उपपदार्थाच्या निमिर्तीस प्रोत्साहन व चालना देणे हा या गो शाळेमागचा उद्देश आहे विविध विभागांच्या व संस्थांच्या सहकार्याने पशुसंवर्धन विषयक उपक्रम राबविणे गरजेचे आहे.

संस्था धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी आवश्यक आहे. संस्थेंचे गेल्या तीन वर्षाचे लेखापरिक्षण  व गोवंश संगोपनाचा कमीतकमी तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. संस्थेचे मालकीची किमान पाच एकर जमिन असावी .योजनेच्या मार्गदर्शक सुचना तसेच अर्ज या करीता तालुक्यातील पशुधन विकास अधीकारी पंचायत समिती यांच्या संपर्क करुन उपलब्ध करुन घ्यावेत व जिल्ह्यातील गोशाळांनी दि. 19 जुलै 2023 पर्यंत जिल्हा पशुंसवर्धन उपायुक्त कार्यालय बुलढाणा यांचे कडे अर्ज सादर करावेत.असे आवाहन डॉ.आर.एस.पाटील,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बुलढाणा यांनी केले आहे.

                                                                    00000

 

जिल्हयातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी कौशल्याची मागणी सर्वेक्षणमोहिमेत सहभागी व्हावे –प्रांजली बारस्कर

 

बुलढाणा, दि‍.05 :-  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग कार्यकारी समिती मार्फत तयार करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विभाग आराखड्याच्या माध्यमातुन कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांशी योजनाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या करीता राज्यातील युवक व युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास यशस्वी उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी युवक / युवतींना मागणीवर आधारीत कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी कौशल्याची मागणी सर्वेक्षण मोहिमेचेदि. 01.07.2023 ते दि. 31.07.2023 दरम्यान आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील युवक-युवतींना मागणी असलेले गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दर्जेदार प्रशिक्षण संस्था मधुन प्राप्त व्हावे यासाठी सदर मोहिमेंतर्गत सर्वेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे.

 

गुगल फार्म लिंक :https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8अशी आहे.

गुगल फार्म भरण्याची अंतिम मुदत :- दिनांक 31 जुलै,2023

            बुलडाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक युवक / युवतींनी सदर मोहिमेचालाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती प्रांजली बारस्कर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,बुलडाणा यांनी केले आहे. याबाबत काही अडचण किंवा शंका अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क साधावा कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक  07262- 242342 यावर संपर्क साधावा.

                                                                        000000

 

 पाणी टंचाई निवारणार्थ 51 गावात 18 कुपनलिका व 37 विंधन विहीरींना मंजूरात

बुलडाणा, दि.05 : पाणीटंचाई निवारणार्थ मोताळा  तालुक्यातील 11, सिंदखेडराजा तालुक्यातील 13, शेगाव तालुक्यातील 11, संग्रामपूर मधील 09, जळगाव जामोद तालुक्यातील 51 गावासाठी 18 कुपनलिका व 33 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण 55 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,  यांनी करावयाचा आहे.

   विंधन विहीरी मोताळा तालुक्यातील चार्वदा,पिंपळगावनाथ, चिंचखेडनाथ, सहस्त्रमुळी,बोराखेडी,कोथळी, धामणगाव बढे,घुसर बु, खैरखेड, लपाली, तपोवन. सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव, नागझरी, धोरव्ही, जउळका, मलकापुर पांग्रा,निमगाव वायाळ, पांग्री काटे, शेलगाव राउत, पिंपळगाव सोनारा, पोफळ शिवनी, राहेरी बु, वाघजाई, वर्दडी बु,. शेगाव तालुक्यातील कठोरा, पहुरपुर्णा, आळसणा,भोनगाव, मनसगाव, सगोडा, चिंचखेड, जानोरी, कुरखेड, वरखेड बु, टाकळी विरो . संग्रामपूर तालुक्यातील एकलारा, काकनवाडा बु, पिंप्री आडगाव, रुधाना, सावळा, रिंगणवाडी, सोनाळा, टुनकी बु, टुनकी खु,. तर जळगाव जामोद या तालुक्यातील निमखेडी (रेलास चोंगळ टापरी), डुक्करदरी घोगरा ( धनसिंग महाराज टापरी), वाडी बु परधी वाडा, चाळीस टापरी, गोमाळ, इस्लामपुर आदिवासी वस्ती  या गावांसाठी  कुप निलिका व विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

                                                            000000000

No comments:

Post a Comment