Thursday 6 July 2023

DIO BULDANA NEWS 04.07.2023

 पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी

 बुलढाणा, दि‍.04 :-  राज्यात दि.३ जुलै २०२३ पर्यंत १४०.९मिमी पाऊस पडलेला  असून तो राज्याच्या ३ जुलै पर्यंतच्या  सरासरी पर्जन्यमानाच्या (२३९.६ मिमी ) ५८.८% प्रत्यक्ष पाऊस पडलेला आहेहंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून दि.३.०७.२०२३ अखेर प्रत्यक्षात ९.४६ लाख  हेक्टर (७ टक्के) पेरणी झालेली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामाला वेग येईल. खरीप हंगाम २०२३ करीता १९.२१लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विं.बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १५,९२,४६६ क्विंटल (८२%) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामा करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.खरीप हंगाम २०२३ करिता राज्यास ४३.१३ लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत ४४.१२ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी १६.५३लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात २७.५९ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी. दिनांक २३ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये एक रुपयात पिक विमा अर्थात "सर्व समावेशक पीक विमा" योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल.दि. २७ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात नैसर्गिक / सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनला सन २०२२-२३ ते  सन २०२७-२८ या कालावधी करिता  मुदतवाढ देऊन डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या नावाने सदर योजनेची व्याप्ती दुसऱ्या टप्प्यात राज्यभर वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . सदरहू योजनेकरीता राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत रु.१९२०.९९ कोटीच्या आर्थिक तरतूदीस मान्यता दिलेली आहेराज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे  आणि खतांचा साठा उपलब्ध असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी असे आवाहन राज्याचे मा. आयुक्त कृषी, सुनील चव्हाण यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलेले आहे.

00000000

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ रुपया भरुन शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा.

बुलढाणा, दि‍.04 :-  प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (80:110) नुसार खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहेप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा केंद्र शासनाने खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी टक्के असा मर्यादित  ठेवला आहे.

सन 2023-24 पासून सर्वसमावेशक  पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहेराज्य शासनामार्फत सदरचा शेतकरी हिस्स्याचा भार सुध्दा शेतक-यांवर न ठेवतात्यांच्या हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरणेबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहेत्यामुळे शेतक-यांना केवळ 1/- रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिकेगळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजना राज्यात शासनाने खरीप हंगामामधील १४ पिके, रब्बी हंगामामधील ६ पिकांकरीता अधिसूचित केलेल्या महसुल मंडळ/मंडळ गट किंवा तालुकास्तरावर अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल.

                                                00000000

जिल्हा विकास आरखडा बाबत नागरिकांना जाहिर आवाहन

बुलढाणा, दि‍.04 :-  बुलडाणा जिल्हयातील सर्व नागरिकांना, संस्था व आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत India@2047 करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.  सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्‍ट जाहीर केले आहे. सन 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट सुध्दा 2047 पर्यंत संपूर्णपणे विकाससित होणे गरचेचे आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.7 ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे शक्य होईल व असा विकास सर्वसमावेश असेल आणि शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल. जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता शासनाने निर्देश दिलेले आहेत. त्याकरिता पुढील बाबींबाबत आपले अभिप्रायाची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या बाबीबाबत अभिप्राय घेतला जाईल. जिल्हयाच्या विकासासाठी कृषी व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्माण सह), जलसंधारण, पायाभुत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन इ. क्षेत्रांची वृध्दीबाबत अभिप्राय. शाश्वत विकास ध्येय 2023 उद्दिष्ट साध्य करणे. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी करावयाच्या उपाययोजना व आपले अभिप्राय dpobuldanadpc@gmail.com या मेल आयडीवर किंवा लेखी स्वरुपात दि. 12 जुलै 2023 पर्यंत जिल्हा नियेजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय,बुलडाणा-443001 या  पत्यावर कळवावे असे जिल्हा नियोजन अधिकारी सु.च. लाड जिल्हा नियोजन समिती, बुलडाणा यांनी कळविले आहे.

                                                            000000000

आदिवासी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलढाणा, दि‍.04 :-  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्त असलेले आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगांव जि. बुलडाणा येथे रिक्त जागांसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 ची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 8 वी शालेय विभाग), इयत्ता 11 वी (क. महाविद्यालय विभाग), व पदवी, पदवित्तर (वरिष्ठ महाविद्यालयीन विभाग) विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेशासाठी www.swayam.mahaonline.gov.in या संकेत स्थाळावर जाऊन आपली नोंदणी 31 जुलै 2023 पुर्वी करण्यात यावी व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व आवश्यक कागपदत्रे वसतिगृह कार्यालयात जमा करण्यात यावेत, असे आवाहन. मा. प्रकल्प अधिकारी. एकात्मिक अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला व गृहपाल,आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह खामगाव यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे.

                                                            000000

जळगाव जा. येथील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलढाणा, दि‍.04 :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह जळगांव जामोद, जिल्हा बुलढाणा येथील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता सुरु करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील अनु. जाती, अनु. जमती,भटक्या विमुक्त जाती-जमाती, आर्थिकदृष्टया मागास तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील. शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन व व्यासायीक अभ्यासक्रम जळगांव जामोद येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहतील. प्रवेश अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येत आहे. app.eprashasan.com/onlineadmission/hostel  या लिंकचा वापर करुन प्रवेश अर्ज भरता येईल. अमरावती विभागातील कोणत्याही वसतीगृहामध्ये या लिंकव्दारे प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेशाबाबत सर्व अद्ययावत माहिती, सुचना यापुढे सदर लिंक द्वारे प्रवेश अर्ज भरता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन वसती गृहपाल ए.एस. इंगळे, यांनी केलेले आहे. अधिक माहितीकरिता पुढील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी. भ्रमणध्वनी क्रमांक 9423761403,8605313286.

                                                   00000000

 मलकापूर येथील मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलढाणा, दि‍.04 :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह मलकापूर. बोदवड रोड मलकापूर, जिल्हा बुलडाणा येथील वसतीगृह प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता सुरु करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील अनु. जाती, अनु. जमती,भटक्या विमुक्त जाती-जमाती, आर्थिकदृष्टया मागास तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थीनी प्रवेशास पात्र असतील. शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन व व्यासायीक अभ्यासक्रम मलकापूर येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थीनी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहतील. प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येत आहे. app.eprashasan.com/onlineadmission/hostel  या लिंकचा वापर करुन प्रवेश अर्ज भरता येईल. अमरावती विभागातील कोणत्याही वसतीगृहामध्ये या लिंकव्दारे प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेशाबाबत सर्व अद्ययावत माहिती, सुचना यापुढे सदर लिंकद्वारे प्रवेश अर्ज भरता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यीनीना प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन वसती गृहपाल एस. व्ही. सोनटक्के, यांनी केलेले आहे. अधिक माहितीकरिता पुढील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी. भ्रमणध्वनी क्रमांक 9373425669,9763949361

                                                   00000000

 नांदुरा येथील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

बुलढाणा, दि‍.04 :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलडाणा अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नांदुरा, जिल्हा बुलडाणा येथील वसतीगृह प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2023-24 करीता सुरु करण्यात आलेली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय आरक्षित टक्केवारीनुसार समाजातील अनु. जाती, अनु. जमती,भटक्या विमुक्त जाती-जमाती, आर्थिकदृष्टया मागास तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग,अपंग, अनाथ इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशास पात्र असतील. शालेय, विद्यालयीन व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाच्या नांदुरा येथील नगर परिषद हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय मधील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थीनी प्रवेश अर्ज भरण्यास पात्र राहतील. प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येत आहे. app.eprashasan.com/onlineadmission/hostel  या लिंकचा वापर करुन प्रवेश अर्ज भरता येईल. अमरावती विभागातील कोणत्याही वसतीगृहामध्ये या लिंकव्दारे प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेशाबाबत सर्व अद्ययावत माहिती, सूचना यापुढे सदर लिंकव्दारे प्रवेश अर्ज भरता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यीनीना प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन वसती गृहपाल एस. व्ही. सोनटक्के, यांनी केलेले आहे. अधिक माहितीकरिता पुढील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष वसतीगृहाला भेट द्यावी. भ्रमणध्वनी क्रमांक 8975778949

                                                   00000000

No comments:

Post a Comment