DIO BULDANA NEWS 30.04.2023
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी
बुलडाणा, दि. ३० : जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त निवासी जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, नायब तहसीलदार संजय बनगाळे. नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन केले.
000000
महाराष्ट्र दिनानिमित्त आज ध्वजारोहण
बुलडाणा, दि. ३० : महाराष्ट्र दिनाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. १ मे रोजी सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
पोलिस कवायत मैदान येथे ध्वजारोहण मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment