Friday 23 December 2022

DIO BULDANA NEWS 23.12.2022

 


राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त

आज कार्यक्रमाचे आयोजन

बुलडाणा, दि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त येथील तहसिल कार्यालयात शनिवारी, दि. 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. तसेच हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. तहसिल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

00000

अल्पसंख्याक समुदायाने योजनांचा लाभ घ्यावा

- जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा

बुलडाणा, दि. 23 : शासन अल्पसंख्याक समुदायासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ घेऊन अल्पसंख्याक समुदायाने आपला विकास साधवा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त अल्पसंख्याक समाजातील नागरीकांना घटनात्मक हक्काची माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक हक्‍क दिवस साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड अध्यक्षस्थानी होते. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी दिनेश गिते, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, जितेंद्र जैन आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात शिक्षणाधिकारी कार्यालयाचे निलेश चिंचोले यांनी केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती दिली. मौलाना आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापक ज्योती हिवाळे यांनी अल्पसंख्याक समाजातील विकास कार्यक्रमाचे प्रसारण, विविध कर्ज योजनांबाबत माहिती दिली. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महेंद्र सपकाळ यांनी मुद्रा योजनेबाबत मार्गदर्शन केले. इंटरनॅशनल ह्युमन राईट कमिशनचे राज्याध्यक्ष प्रा. एस. पी. हिवाळे आणि ॲड. वसिम कुरेशी यांनीही अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले. मेसाचे सचिव अबरार फारुकी, मुख्याध्यापक काझी रईसोद्दिन अलीमुद्दीन, अखिल डिगंबर जैन सैतवाल संस्थेचे अरविंद सैतवाल यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मोनिका रोकडे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र सोभागे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिक्षक शामला खोत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

000000

No comments:

Post a Comment