Sunday 4 December 2022

DIO BULDANA NEWS 03.12.2022

 







सामाजिक न्याय समता पर्वानिमित्त

अनुसूचीत जाती, नवबौद्धांच्या वस्तींना भेटी
बुलडाणा, दि. ३ : सामाजिक न्याय पर्वात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शुक्रवार, दि. 2 डिसेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यात अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देण्यात आल्या.
जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांचे गृहपाल, अनुसूचीत जाती व नवबौध्द मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळामधील मुख्याध्यापक, तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नगरपालिका हद्दीतील अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी दिल्या.
समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पी. एम. धर्माधिकारी यांनी मेहकर येथील अनुसूचीत जाती व नवबौध्दघटकांच्या वस्तींना भेटी दिल्या. गृहपाल श्री. खेडकर यांनी चिखली, श्री. सरोदे यांनी मेहकर, श्री. बघे यांनी शेगाव, श्रीमती नरवाडे व मुख्याध्यापक श्री. वाकोडे यांनी बुलडाणा, मुख्याध्यापक श्री. जाधव यांनी चिखली, प्रभारी गृहपाल श्रीमती जोशी यांनी चिखली, प्रभारी गृहपाल श्री. सोनवाल यांनी देऊळगाव राजा, प्रभारी गृहपाल श्री. मुरमुरे यांनी लोणार, प्रभारी गृहपाल श्रीमती काटे यांनी खामगाव येथे प्रत्यक्ष भेटी दिल्या. । यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
00000


दिव्यांग दिनानिमित्त हेलन केलर यांना अभिवादन 
बुलडाणा, दि. ३ : जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त हेलन केलर यांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संजय बंनगाळे, विजय धांडे, रामशेठ ठाकूर, एन. टी. एसकर, किशोर केने, डी. डी. लोखंडे, प्रवीण डोंगरे, व्ही. पी. हिवाळे, डी. डी. भोलाणे, वाय. एस. मुळे, सुरेश जगताप, गजानन हिंगे व अधिकारी उपस्थित होते
00000

No comments:

Post a Comment