Monday 12 December 2022

DIO BULDANA NEWS 12.12.2022

 

निर्यातक्षम फळबागेची शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 : जिल्ह्याचा समावेश ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, ऑरेंजनेट, ऑदरनेट, व्हेजनेट व बीटलनेट अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षात करण्यात आलेला आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यामध्ये आंबा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू, केळी व भाजीपाला या फळपिकाची लागवड आहे. या कार्यक्रमांतर्गत आंबा, द्राक्ष, डाळिंब, संत्रा, लिंबू, केळी व भाजीपाला बागांची तपासणी करून नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच हळद लागवड क्षेत्राची नोंदणी सुद्धा व्हेजनेट अंतर्गत करण्यात येणार आहे. निर्यातक्षम बागांची नोदणी करण्याचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यात ताजी फळे निर्यातील भारतात आघाडीवर आहे. युरोपियन युनियनला व इतर देशांना निर्यातीकरिता प्रामुख्याने किडनाशक उर्वरित अंश व किड व रोग मुक्त उत्पादनाची हमी देणे आवश्यक असल्यामुळे अपेडा व कृषी विभागाच्या समन्वयाने राज्यात रेसिडयु मॉनीटरिंग प्लॅनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामध्ये निर्यातक्षम बागांची नोंदणी, त्याची तपासणी, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे इत्यादी कामे कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेत.

निर्यातक्षम फळबागेची नोंदणीमध्ये ग्रेपनेटसाठी ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३, मँगोनेटसाठी          डिसेंबर २०२२ ते  मार्च २०२३ आणि अनारनेट, अनारनेट, ऑरेंजनेट, ऑदरनेट, व्हेजनेट, बीटलनेटसाठी वर्षभर ऑनलाईन नोंदणी सुरु राहणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बुलडाणा यांनी केली आहे.

00000

मका. ज्वारीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 : जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे हमी दराने मका, ज्वारी व बाजरी नोंदणीसाठी दि. ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. शासनाच्या आदेशानुसार आता मका आणि ज्वारी नोंदणीसाठी दि. १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना हमीदराचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांची कमी झालेली नोंदणी पाहता शेतकऱ्यांचे नोंदणीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने नोंदणीस मुदतवाढ दिली होती. आताही मका आणि ज्वारीच्या नोंदणीसाठी दि.१५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच खरेदीसाठी दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत कालावधी दिला आहे.

शेतकऱ्यांनी स्वतः महानोंदणी मोबाईल अॅपवर किंवा प्रत्यक्ष संस्थेच्या नोंदणी केंद्रावर जाऊन शेतकरी नोंदणी करावी. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना हमीदराचा लाभ घेण्यासाठी एसएमएस येईल त्यांनी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून खरेदीसाठी माल घेऊन यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment