DIO BULDANA NEWS 04.12.2022






 मेहकर इंटरचेंज येथे  मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांकडून

छत्रपती शिवाजी महाराजबाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

बुलडाणादि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण होत असलेल्या हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याची आज पाहणी केली. यादरम्यान जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजबाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

यावेळी खासदार प्रतापराव जाधवआमदार अॅड. आकाश फुंडकरसंजय रायमूलकरमुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुतेजिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहन चालवत मेहकर इंटरचेंज गाठले. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. या ठिकाणच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जिल्ह्यात महामार्गावर मेहकर आणि देऊळगाव राजा येथे दोन इंटरचेंज देण्यात आले आहे. जिल्ह्यात 89 किमीचा मार्ग उभारण्यासाठी आला आहे. हा मार्ग जिल्ह्यातील मेहकरसिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तीन तालुक्यातून जात आहे.  या मार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर त्यांनी सिंदखेड राजाकडे प्रयाण केले.

00000


Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या