उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा

बुलडाणा,(जिमाका) दि.20 : राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार हे शनिवार, दिनांक 21 मे 2022 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

    त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 21 मे रोजी सकाळी 9.15 वाजता औरंगाबाद येथून हेलिकॉप्टरने सिंदखेडराजाकडे प्रयाण, सकाळी 9.40 वाजता जिजाऊ सृष्टी, सिंदखेडराजा हेलिपॅड येथे आगमन, सकाळी 10 वाजता माँ जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन, त्यानंतर सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक स्थळांची पाहणी, दु. 2 वाजता पंचायत समिती सभागृहात सिंदखेडराजा विकास आराखडा व जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती, दु. 4.15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, सिंदखेडराजा येथे आगमन व राखीव, दु. 4.40 वाजता देऊळगांवराजा रोड येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज येथे माँ जिजाऊ व शिवबा यांचे नियोजीत पुतळा उभारणी स्थळाची पाहणी करतील.

   सायं 5 वाजता जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा हेलिपॅड येथे आगमन व जळगांव जामोदकडे प्रयाण, सायं 5.40 वाजता कुटे मैदान हेलिपॅड, जळगांव जामोद येथे आगमन, सायं 5.45 वा शासकीय विश्रामगृह येथे राखीव, सायं 7 वाजता एसकेके कॉलेज प्रांगण येथे आगमन व जाहीर सभेस उपस्थिती, रात्रौ 9.30 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, अकोलाकडे प्रयाण करतील. 

--

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या