Thursday 19 May 2022

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज आमंत्रित

 हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज आमंत्रित

  • 10 जुन 2022 अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि.19: केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2022-23 या शैक्षणिक सत्राकरीता सहा सत्रामधील तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. राज्यातून बरगढ (ओडीसा) करीता 13 अधिक 1, वेंकटगिरीसाठी 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचेमार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज 10 जुन 2022 पर्यंत मागविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज 10 जुन 2022 पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.diretexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत, क्रमांक 2, 8 वा माळा, बि- विंग, सिव्हील लाईन, नागपूर 440001 या पत्त्यावर संपर्क करावा व अर्ज प्राप्त करून घ्यावी. तसेच 0712-2537927 दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.  तसेच अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे, असे प्रादेशिक उपआयुक्त यांनी कळविले आहे.

***********

अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे

  • 31 मे 2022 पर्यंत अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि.19: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला कार्यालया अंतर्गत असलेले जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांनी भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर योजनेचे नवनीन तथा नुतनीकरणाचे अर्ज 2021-22 या शैक्षणिक वर्षात mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावे. या प्रणालीची अंतिम मुदत 31 मे 2022 आहे.

  तरी जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सन 2020-21 व 2021-22 याबाबत महाविद्यालय स्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांचे नविन अर्ज व नुतनीकरण अर्ज तात्काळ त्रुटी पुर्तता करून प्रकल्प अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या लॉग ईनला पाठवावेत. सदर विद्यार्थ्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी महाविद्यालय स्तरावर जतन करून ठेवण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज भरून महाविद्यालय स्तरावर सादर करावे. याबाबत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर अवगत करण्यात यावे.  अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेच्या लाभापासून वंचित राहील्यास याची संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची राहील, याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                ***

No comments:

Post a Comment