Friday 1 October 2021

DIO BULDANA NEWS 1.10.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 691 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 06 पॉझिटिव्ह

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 697 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 691 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 217 तर रॅपिड टेस्टमधील 474 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 691 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  लोणार तालुका : नागझरी 1, मातमळ 1, जळगांव जामोद शहर : 1, बुलडाणा शहर : 3,   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 06 रूग्ण आढळले आहे.                                          

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 718907 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86879 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86879 आहे.  आज रोजी 559 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 718907 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87571 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86879 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

कोरोना संसर्ग नियम पाळून 7 ऑक्टोंबरपासून धार्मिक स्थळे होणार खुली

  • जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांचे आदेश

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जिल्ह्यात प्रतिबंधीत क्षेत्रा बाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोंबर 2021 पासून कोरोना संसर्गाचे नियम पाळून खुली केली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहीते अन्वये दिले आहेत.

   धार्मिक स्थळे अथवा प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात. अशा ठिकाणी अथवा ठिकाणांच्या आवारात कोविड 19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठी योग्य सामाजिक अंतर आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. कंटेन्टमेंट झोनच्या आतील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. केवळ कंन्टेटमेंट झोनच्या बाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे सुरू करण्यास परवानगी असणार आहे. धार्मिक स्थळी 65 वर्षावरील नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला  आणि 10 वर्षाखालील लहान मुले यांनी घरीच रहावे. धार्मिक अथवा प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सामान्य प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन सर्व कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांनी करावे. सर्व सार्वजनिक ठिकाणी शक्यतोवर वैयक्तिक कमीत कमी 6 फूट शारिरीक अंतर राखणे आवश्यक राहणार आहे. मास्क किंवा स्वच्छ रूमाल यांचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. साबणाने वारंवार हात स्वच्छ धुवावे किंवा अल्कोहोलयुक्त सॅनीटायझरचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. यचे उल्लंघन केल्यास स्थानिक प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा.

                                                    या उपाययोजनांचा अवलंब करावा

प्रवेशद्वारावर सॅनीटायझर डिस्पेंसर, थर्मल स्क्रीनींगची सोय असावी, कोविड लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, मास्क लावलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना पोस्टर्सच्या माध्यमातून दर्शनी भागात लावाव्यात. तसेच ऑडीओ व व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृतीसाठी प्रसरीत कराव्यात, वाहन पार्किंगच्या ठिकाणी तसेच परीसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषांचे पालन करून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करावे, धार्मिक ठिकाणच्या परीसरात बाहेरील सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटरीया या ठिकाणी पुर्णवेळ सामाजिक अंतराचे आणि संबंधीत मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, धार्मिक स्थळांच्या परीसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी विशिष्ट मार्किंग करावे, पुतळे, मुर्ती, पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्याची परवानगी नसावी, एकमेकांना अभिवादन करताना शारिरीक संपर्क टाळावा, प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे आदीसारख्या शारीरिक अर्पणांना परवानगी असणार नाही. धार्मिक ठिकाणी प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गांची स्वतंत्र व्यवस्था असावी, या ठिकाणी भाविकांना बसण्याची व्यवस्था करताना योग्य सामाजिक अंतराचे पालन करावे, वातानुकूल यंत्र अथवा वायुविजनसाठी सीपीडब्ल्यूडी च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात यावे. वातानुकूलीत यंत्रणांचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सीअस पर्यंत राखले जाईल. तसेच सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्के पर्यंत असावी, धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई अथवा जमखाना वापर करण्यास परवानगी असणार नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा, जो प्रार्थनेनंतर परत घेवून जावा, धार्मिक स्थळी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोविड सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा असून  आठवड्यातून एकदा कोविड चाचणी करणे आवश्यक आहे, खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रीत करावी.

संशयीत रूग्ण आढळल्यास ही कारवाई करावी

आजारी व्यक्तीला इतरांपासून दूर ठेवावे, डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क वापरावा, तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात कळवून स्थानिक प्रशासनास कळवावे, नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे सदर रूग्णाबाबत जोखीम मूल्यांकन केले जाईल. त्यानुसार रूग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत कार्यवाही करावी.

सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, समूह, संस्था अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचेविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.                

*******

चालक पोलीस अंमलदार परीक्षेचे 4 ऑक्टोंबर रोजी आयोजन

  • बुलडाणा शहरात 12, चिखली शहरात 7 परीक्षा केंद्र

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : जिल्हा चालक पोलीस अंमलदार भरतीसाठी 30 नोव्हेंबर 2019 व 5 ऑगस्ट 2021 मध्ये जाहीरात देण्यात आली होती. त्याप्रमाणे या पदासाठी 4 ऑक्टोंबर रोजी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा बुलडाणा शहरातील 12 व चिखली शहरातील 7 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. बुलडाणा शहरात एकूण 172 खोल्यांमध्ये 4128 परीक्षार्थी, तर चिखली येथे 104 खोल्यांमध्ये 2494 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 19 परीक्षा केंद्रामध्ये 276 खोल्यांमधून 6622 परीक्षार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

   या परीक्षेसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांचे मार्गदर्शनाखाली 1 अप्पर पोलीस अधिक्षक, 2 पोलीस उपअधिक्षक, 17 पोलीस निरीक्षक, 38 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, 531 पोलीस अंमलदार, 53 महिला पोलीस अंमलदार, 34 व्हिडीओ कॅमेरे व 7 वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षार्थी उमेदवार यांचे छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे. पारदर्शकता कायम राहील याची दक्षता घेतली जाईल. परीक्षार्थी उमेदवारांनी कोणत्याही आमीशाला बळी पडू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.

  सदर परीक्षा संबधाने कोणीही लाचेची अथवा कोणत्याही प्रकारची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांच्या 7062242548 क्रमांकावर संपर्क करावा. परीक्षेसंबंधीत अधिक माहितीसाठी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनच्या 07262-242327, नियंत्रण कक्ष बुलडाणा 07262-242400, चिखली पोलीस स्टेशन 07264-264067, ॲपटेक कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर समीर सोनकुसरे यांच्या 9004794946 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक यांनी केले आहे.

ही आहेत परीक्षा केंद्र

बुलडाणा शहर : शारदा ज्ञानपीठ, प्रबोधन विद्यालय, शिवसाई ज्युनिअर कॉलेज, एडेड ज्युनिअर कॉलेज,  उर्दू ज्युनिअर कॉलेज, भारत विद्यालय, सहकार विद्या मंदीर, जिजामाता महाविद्यालय, कँब्रीज इंग्लीश स्कूल, श्री संत गजानन महाराज फार्मसी कॉलेज, राजीव गांधी सैनिकी शाळा, श्री शिवाजी विद्यालय. चिखली शहर : राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा चांधई, राधाबाई खेडेकर विद्यालय, श्री. शिवाजी हायस्कूल, आदर्श विद्यालय दिनदयाल नगर, श्री. शिवाजी सायन्स अँड आर्ट कॉलेज, अनुराधा इंग्लीश मिडीयम स्कूल, आदर्श कॉन्वेट ज्ञानपीठ.  

असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र

पोलीस भरती चालक – 2019 परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र, परीक्षेचे शहर, परीक्षा केंद्र, परीक्षा तारीख व वेळ https:// mhpolicebharti.cbtexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सेकेतस्थळाला भेट देवून संबंधित युनिटचे नाव निवडा व प्रोसीडवर क्लिक करावी. लॉगीन आयडीवर क्लिक करा आणि आपला युजर आयडी जन्माची तारिख व नोंदणीकृत ईमेल आयडी प्रविष्ठ करावी. प्रोसीडवर क्लिक आणि तुमचा युजर आयडी, पासवर्ड एंटर करा व लॉगीन वर क्लिक करा. त्यानंतर प्रिंट ऍडमिट कार्ड बटनावर क्लिक करावे.

*****

                 विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती जिल्हा दौऱ्यावर

  • 4 ते 6 ऑग्स्ट पर्यंत असणार जिल्ह्यात

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती 4 ते 6 ऑक्टोंबर 2021 दरम्यन जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सोमवार, दि. 4 ऑक्टोंबर सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामभवन, बुलडाणा येथे एकत्र जमणे, सकाळी 9 ते 9.30 शासकीय विश्राम भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व मागासवर्गीय संघटना यांच्यासमवेत अनौपचारीक चर्चा करणे, सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालय व नगर पालिका कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृह, बुलडाणा येथे जिल्हा परिषद कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमेत  चर्चा,  दु 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृह येथे अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दुपारी 2 ते 2.30 राखीव, दुपारी 3 ते सायं 6 वाजेपर्यंत जिल्ह्यातील मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रातंर्गत शासकीय व अनुदानित शाळा, वसतीगृह, जिल्हा परिषद व नगरपरिषदा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना भेटी देणे तसेच नगर पालिका / नगर परिषद बुलडाणा क्षेत्रातील दलित वस्तीमधील कामांना भेटी व पाहणी करून संबधीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सायं 6 वाजेनंतर शासकीय विश्राम भवन येथे मुक्काम करतील.

    मंगळवार, दि. 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय बुलडाणा परिमंडळ कार्यालया अंतर्गत येत असलेल्या बुलडाणा शहर व बुलडाणा ग्रामीण कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 10.30 ते 11.30 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 11.30 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 12 ते 1 वाजेदरम्यान जिल्हा‍धिकारी कार्यालयात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 1 ते 1.30 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 1.30 ते 2 वाजेदरम्यान उप वनसंरक्षक कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 2 ते 3 राखीव, दु 3 ते सायं 6 जिल्ह्यातील मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रातंर्गत शासकीय व अनुदानित शाळा, वसतीगृह, जिल्हा परिषद व नगरपरिषदा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना भेटी देणे तसेच नगर पालिका / नगर परिषद बुलडाणा क्षेत्रातील दलित वस्तीमधील कामांना भेटी व पाहणी करून संबधीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सायं 6 नंतर शासकीय विश्राम भवन येथे मुक्काम करतील.  

    बुधवार, दि 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक कार्यालयातील कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच राबविण्यात येणाऱ्या योजना पाठविण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत एसटी व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेषबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दु 12 ते 1 वाजेपर्यंत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेषबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दु 1 ते 2 वाजेपर्यंत औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा,दु 1.30 ते 2.30 राखीव, दु 2.30 ते सायं 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाजी उपयोजना सन 2021-22 जिल्हा वार्षिक योजना  आराखडा याबाबत आढावा बैठक, समितीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिलेल्या भेटी व विविध  कार्यालयात झालेल्या बैठकांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहे.

******

No comments:

Post a Comment