Wednesday 20 October 2021

DIO BULDANA NEWS 20.10.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 223 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह                                                                                   

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 224 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 223 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 164 तर रॅपिड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 223 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : वाडी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळले आहे.                                              

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 727440 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86917 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86917 आहे.  आज रोजी 37 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 727440 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87604 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86917 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 13 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                                        *************

महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : 'रामायणा'चे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनीही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

                                                                                                                ************

बांधकाम कामगारांनी डिबीटीद्वारे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा

  • बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी
  • कामगाराची फसवणूक झाल्यास पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी

बुलडाणा,(जिमाका) दि.20: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत बांधकाम कामगारांची मंडळात नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. लगतच्या मागील 12 महिन्यात बांधकाम मजूर म्हणून किमान 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्या बांधकाम कागमारांची मंडळात नोंदणी करण्यात येवून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पद्धतीने खात्यात जमा करण्यात येतो.

   जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी स्वत:ची नोंदणी करण्यासाठी www.mahabocw.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह त्यामध्ये ओळखीचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, स्वयं घोषणापत्र, 90 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम केल्याचे प्रमाणपत्र, स्वत:चे बँकेचे पासबुक आदींचा समावेश असावा. तसेच ज्या बांधकाम कामगारांना नुतनीकरण झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यास त्यांनी सुद्धा ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. त्यानंतर अर्ज नामंजूर झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यास त्रुटींची ऑनलाईन पुर्तता करून अर्ज परत सादर करावा. तदनंतर सदर कामगारास अर्ज मंजूर झाल्याचा संदेश दुरध्वनीवर प्राप्त झाल्यानंतर कार्यालयात प्रत्यक्ष बांधकाम कामगारांनी उपस्थित राहून नोंदणी अथवा नुतनीकरण पावती व नवीन नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगारांनी स्मार्ट कार्ड प्राप्त करून घ्यावे. याकरिता नोंदणी शुल्क 25 रूपये व नुतनीकरण शुल्क 1 रूपया प्रती माह प्रमाणे 12 रूपये एक वर्षाचे भरून पावती घ्यावी. या व्यरितिरिक्त कोणतेही शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. तसेच मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांकरीतासुद्धा बांधकाम कामगारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा.

   लाभाचे अर्ज तपासणी नंतर लाभाची रक्कम बांधकाम कामागारांच्या खात्यात परस्पर आरटीजीएस द्वारे मंडळ स्तरावरून वर्ग करण्यात येते. तरी कार्यालयीन कामकाजाकरीता कामगारांनी प्रत्यक्ष कार्यालयास संपर्क साधुन कामकाज करावे. त्रयस्थ व्यक्तीच्या मोहाला बळी पडू नये. कोणत्याही कामगाराची जर फसवणूक होत असेल, तर त्यांनी संबंधीतांविरूद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी आ. शी राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

                                                                                    *********

अनुकंपाधारक उमेदवारांची 26 ऑक्टोंबर रोजी कागदपत्रे तपासणी

बुलडाणा,(जिमाका) दि.20: जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांचे एकूण 331 उमेदवारांची ज्येष्ठता यादीतील ज्येष्ठता सूची व शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व सरळसेवेच्या आरक्षीत रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची तात्पुरती निवड यादी यापूर्वी 15.9.2021 रोजी जि.पच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर 20 सप्टेंबर रोजी लेखी आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार तात्पुरत्या निवड यादीवर प्राप्त आक्षेपांची सुनावणी घेवून पडताळणी करण्यात आली आहे. अनुकंपाधारक उमेदवार यांचे शैक्षणिक पात्रतेचे मुळ कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची 26 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता 21.9.2017 च्या शासननिर्णयातील तसतुदीनुसार समुपदेशन प्रक्रियेद्वारे पात्र अनुकंपाधारक उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. तरी  संबंधित अनुकंपाधारक उमेदवार यांनी 26 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जि. प बुलडाणा येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                         

No comments:

Post a Comment