Monday 4 October 2021

DIO BULDANA NEWS 4.10.2021

  


अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला नगरपालिका, महसूल विभागाचा आढावा

  • विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नतीवर चर्चा
  • अनुसूचित जाती कल्याण योजनांचाही आढावा
  • पुरग्रस्त मदत, नुकसानीची घेतली माहिती

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आजपासून 6 ऑक्टोंबरपर्यंत जिल्हा दौऱ्यावर आहे. समितीने दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज 4 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड आदी उपस्थित होते. तसेच विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदीही उपस्थित होते.

   समितीने सर्वप्रथम जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. समितीला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी जिल्ह्यातील पीक नुकसानीची माहिती दिली. समितीने नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची देता येणारी 5 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पडझड झालेल्या घरांची, मृत पावलेल्या व्यक्ती व दिलेल्या नुकसान भरपाईची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड यांनी प्रास्ताविक केले.  समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, अनुशेष, रिक्त पदे, बिंदुनामावली आदींचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या. त्यानंतर जिल्ह्यातील मलकापूर, मेहकर, लोणार, दे.राजा, सिं.राजा, बुलडाणा, खामगांव, शेगांव, जळगांव जामोद, चिखली व नांदुरा नगर पालिकांमधील व मोताळा, संग्रामपूर नगर पंचायत मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. तसेच नगर पालिका व नगर पंचायत मध्ये दलित वस्ती विकास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतला.  बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाचा आढावा

महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा परिषदेकडील यंत्रणा व समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला.  समितीने जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण, कृषि, पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, पंचायत विभागातील अनुसूचीत जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, आरक्षण, बिंदुनामावली, पदभरती बाबत आढावा घेतला. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कडील दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, शिष्यवृत्ती, वसतिगृह आदींविषयी चर्चा केली. जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह योजना, वसतिगृह, महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना, जि.प सेस फंडमधील मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांचा आढावाही घेतला. पशुसंवर्धन विभागाकडील दुधाळ जनावरे वाटप,  शिक्षण विभागाकडील शालेय पोषण आहार, महिला व बाल कल्याणकडील स्तनदा व गरोदर माता, बालकांना पौष्टीक आहार वाटप आदींचा आढावा घेतला. यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, सहायक आयुक्त श्रीमती अनिता राठोड आदी उपस्थित होते.

 

                                                                                ************* 


अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपदग्रस्तांना तातडीने मदत करावी

-          पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • पूर, अतिवृष्टीच्या नुकसानीचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिके, घरे आदींचे नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासकीय यंत्रणांनी अतिवृष्टीने बाधीत झालेल्या आपदग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात पुर, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

   नुकसान झाल्यानंतर देण्यात येणारी तातडीच्या मदतीचे जलद गतीने वाटप करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, नुकसानपीचे पंचनामे पूर्ण करावे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पंचनामे पूर्ण करून  अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. यामध्ये शासनाकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्याचप्रमाणे धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेती खरडून गेली आहे. अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी. यंत्रणांनी समन्वयातून कुणीही आपदग्रस्त मतदीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 950 कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली.   

                                                                                                                ***********


अनुसूचित जाती कल्याण समितीने केली कामांची पाहणी

  • दलित वस्तीला दिली भेट, रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्याशी साधला संवाद
  • कोलवड येथील अनु. जाती मुलांची शाळा, वसतिगृहाला दिली भेट

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज बुलडाणा शहरातील नगर पालिकेने दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत केलेल्या कामांची पाहणी केली. विश्राम गृहा समोर करण्यात आलेल्या कामांची चौकशीही समितीने केली. त्यानंतर मिलींद नगर भागातील दलीत वस्तीमधील कामे, समस्या आदींची पाहणीही समितीने केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कामाबाबत अत्यावश्यक त्या सूचनाही समितीने दिल्या. यावेळी समिती प्रमुख विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड, विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार  आदी उपस्थित होते.

    त्यानंतर समितीने सर्क्युलर रस्त्यावरील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केली. येथे वसतिगृह अधिक्षकांकडून माहिती घेतली. वसतिगृहातील सुविधा, गरम पाण्याची यंत्रणा, स्वच्छतागृह, निवासी खोल्या आदींची पाहणी करीत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सुचनाही दिल्या. वसतिगृहामागील निर्माणाधीन इमारतीची पाहणीही समितीने केली. त्यानंतर समितीने कोलवड येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलांच्या निवासी शाळेला भेट दिली. याठिकाणी असणाऱ्या सुविधांची माहिती घेत आपली निरीक्षणे नोंदविली. वर्गखोल्यांच्या स्वच्छतेविषयी सुचनाही दिल्या. त्यानंतर समितीने जांभरून येथे रमाई घरकुल योजनेतंर्गत लाभार्थी भास्कर अमृता गवई यांच्या घरकुलाची पाहणी केली. यावेळी समिती प्रमुख व सदस्यांनी लाभार्थ्याशी संवादही साधला. योजनेच्या लाभाविषयी चर्चा केली. याप्रसंगी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                                ******

 

No comments:

Post a Comment