Sunday 3 October 2021

DIO BULDANA NEWS 3.10.2021

 

विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीचा जिल्हा दौरा

  • 4 ते 6 ऑक्टोंबर पर्यंत असणार जिल्ह्यात
  • पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती 4 ते 6 ऑक्टोंबर 2021 दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहे. समिती जिल्ह्यात तीन दिवस राहणार असून दरम्यान पुरग्रस्त भागाची पाहणीही समिती करणार आहे. समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सोमवार, दि. 4 ऑक्टोंबर सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामभवन, बुलडाणा येथे एकत्र जमणे, सकाळी 9 ते 9.30 शासकीय विश्राम भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व मागासवर्गीय संघटना यांच्यासमवेत अनौपचारीक चर्चा, सकाळी 9.30 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा, सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय व नगर पालिका कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे जिल्हा परिषद कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमेत  चर्चा,  दु 1 वा. जिल्हा परिषद सभागृह येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दुपारी 2 वाजता राखीव, दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी व मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रातंर्गत शासकीय व अनुदानित शाळा, वसतीगृह, जिल्हा परिषद व नगरपरिषदा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना भेटी देणे तसेच नगर पालिका / नगर परिषद बुलडाणा क्षेत्रातील दलित वस्तीमधील कामांना भेटी व पाहणी करून संबधीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सायं 6 वाजेनंतर शासकीय विश्राम भवन येथे समिती सदस्य मुक्काम करतील.

    मंगळवार, दि. 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.30 वा जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय बुलडाणा परिमंडळ कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या बुलडाणा शहर व बुलडाणा ग्रामीण कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 10.30 वा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 11.30 वा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील  कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 12 वा जिल्हा‍धिकारी कार्यालयात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 1 वा जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 1.30  वा उप वनसंरक्षक कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात प्रमाणपत्र पडताळणी विषयक बाबींसंदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत चर्चा, दु 2 वाजता राखीव, दु 3 वा जिल्ह्यातील मागासवर्गीय उपयोजना क्षेत्रातंर्गत शासकीय व अनुदानित शाळा, वसतीगृह, जिल्हा परिषद व नगरपरिषदा यंत्रणांकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना भेटी देणे तसेच नगर पालिका / नगर परिषद बुलडाणा क्षेत्रातील दलित वस्तीमधील कामांना भेटी व पाहणी करून संबधीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सायं 6 नंतर शासकीय समिती सदस्य विश्राम भवन येथे मुक्काम करतील.  

    बुधवार, दि 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वा पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष तसेच राबविण्यात येणाऱ्या योजना पाठविण्यात आलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, सकाळी 11 वा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेषबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दु 12 वा राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गातील कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेषबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दु 1 वा औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील अनुसूचित जातींच्या प्रवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा, दु 1.30 वाजता राखीव, दु 2.30 वा जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती उपयोजना सन 2021-22 जिल्हा वार्षिक योजना  आराखडा याबाबत आढावा बैठक, समितीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिलेल्या भेटी व विविध  कार्यालयात झालेल्या बैठकांच्या अनुषंगाने आढावा बैठक व चर्चा करण्यात येईल.

******

दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

बुलडाणा,(जिमाका) दि.3: जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या बुधवारी 6 ऑक्टोंबर 2021 रोजी  जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये  सर्वपित्री अमावस्ये निमित्ताने स्थानिक सुट्टी असल्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण / मतिमंद, कान नाक घसा संबंधित दिव्यांग तपासणी बाबतचे दिव्यांग तपासणी बोर्ड रद्द करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी जिल्हा सामान्य रूग्णालय, बुलडाणा येथील संबंधित दिव्यांग तपासणीस येवू नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

*******

बुलडाणा शहरात दोन अतिरिक्त कोविड लसीकरण सत्रास सुरूवात

बुलडाणा,(जिमाका) दि.3:  बुलडाणा शहरामध्ये अतिरिक्त कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य प्रशासन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्यावतीने तहसिलदार रूपेश खंडारे यांच्या दालनात याबाबत विशेष बैठक 1 ऑक्टोंबर रोजी घेण्यात आली. या बैठकीत शहरातील लसीकरणाबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला. या कृती आराखड्यामध्ये संपूर्ण आरोग्य सत्राचे नियोजन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आल आहे.  यासाठी नगर पालिका प्रशासन त्यांच्या स्तरावरून जनजागृती करणार आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना प्रेरीत करून लसीकरणासाठी घेवून येणार आहेत. शहरातील शिक्षक लाभार्थ्यांची संगणकीय नोंदणी करणार असून पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहणार आहे. या लसीकरण सत्राला 1 ऑक्टोंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते, उपमुख्याधिकारी श्रीकांत पवार, लसीकरण सनियंत्रक दिपक महाले, स्वास्थ्य अभ्यांगता श्रीमती पुजा जाधव, आरोग्य सेविका श्रीमती वंदना मुळे, डॉ. माहूरकर, विशाल काळवाघे यांचे उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. नगरपालिका परीसर व एकता नगर येथील बालक मंदीरात सोमवार ते शुक्रवार लसीकरण सत्र सुरू राहणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी व नगर पालिका  प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

****

मका, ज्वारी व बाजरीच्या शासकीय खेदीसाठी नाव नोंदणीस मुदतवाढ

• 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत करावी नोंदणी

बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मका, ज्वारी, बाजरी या भरडधान्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 14 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत शेतकऱ्यांची नाव नोंदणी करावयाची होती, या नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली असून आता 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मार्केटींग फेडरेशनचे सब एजंट संस्थामार्फत पोर्टलवर ऑनलाईन शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे.  सध्या जिल्ह्यात मका खरेदीसाठी 3012 व ज्वारीसाठी 1762 अशा एकूण 4774 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

    जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, जळगांव जामोद, खामगांव, लोणार, मलकापूर, मेहकर, संग्रामपूर व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा, नांदुरा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी ता. नांदुरा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, चालु असलेला सात बारासह संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

                                                            **********

                           आर्मी स्पोर्टस् इन्स्टीट्युट बॉईज स्पोर्टस् कंपनीकरीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन

            बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : आंतरराष्ट्रीय व आलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवुन त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करणे आवश्यक आहे.   क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व आर्मी स्पोर्टस् इंस्टीट्युट यांचे संयुक्त विद्यमाने बॉईज स्पोर्टस् कंपनी, पुणे येथील प्रवेशाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            जिल्हास्तरीय चाचण्या दि 7 ते दि.09.10.2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे आयोजित होणार आहे.  याकरीता डायव्हींग मुले-8 ते 12 वयोगट राहील.  तसेच ॲथलेटीक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टींग, आर्चरी मुले-10 ते 14 वयोगट राहतील.  संबंधीत खेळाडूंकडे जन्म तारखेचा दाखला असणे आवश्यक आहे.  बॉक्सिंग, तलवारबाजी या खेळाकरीता 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.30 वाजता उपस्थिती द्यावी, कुस्ती, वेटलिफ्टींग व आर्चरी या खेळाकरीता 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.30 वाजता, डायव्हींग, ॲथलेटीक्स व वॉकींग करीता 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे उपस्थित रहावे.  खेळाडू मुलांकरीता दिनांक 01.01.2022 रोजी वय 8 ते 14 वर्ष असणे आवश्यक आहे.  अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर मो. 9423393619, अनिल इंगळे मो.99700711 यांच्याशी संपर्क साधावा. या चाचण्याककरीता कोविड नियमांचे पालन करुन सोबत सॅनिटायझर, मास्क वापर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.

****

No comments:

Post a Comment