Thursday 8 October 2020

DIO BULDANA NEWS 8.10.2020

  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी प्रारूप मतदार केंद्र यादी प्रसिद्ध

  • मतदार यादीत पात्र मतदारांनी नाव नोंदवावे
  • प्रारूप मतदान केंद्रांच्या यादीचे अवलोकन करावे

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 -  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीकरीता जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यांत एक याप्रमाणे एकूण 13 व बुलडाणा तालुक्यात एक सहाय्यकारी मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. असे एकूण 14 प्रारूप मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक विभाग, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सततच्या पुर्ननिरीक्षण कार्यक्रमातंर्गत पात्र मतदारांच्या नावाची नोंद मतदार यादीमध्ये करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त पात्र  मतदारांनी याची नोंद घेवून मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ एस राममूर्ती यांनी केले आहे.

  शिक्षक मतदार संघाच्या यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या मतदारांच्या पाहणीकरीता प्रारूप मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा निवडणूक विभाग येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. तसेच सदर यादीचे अवलोकन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

                                                                                    *******

कोरोना अलर्ट : प्राप्त 351 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 43 पॉझिटिव्ह

• 165 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 394 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 351 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 37 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 273 तर रॅपिड टेस्टमधील 78 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 351 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे - मोताळा तालुका : तालखेड 1, पिंप्री गवळी 1, फुली 1, सांगळद 1, आडविहीर 1, धामंदा 2,   बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : सावळी 1, चांडोळ 1, दे. राज शहर : 1, दे. राजा तालुका : सावंगी टेकाळे 1,  चिखली शहर : 3, सिं.राजा तालुका : रिधोरा 2, नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : दहीगांव 1, मेहकर शहर : 6, मेहकर तालुका : लोणी गवळी 1, पिं. माळी 1, मोळा 1, लोणी काळे 1,  जळगांव जामोद तालुका : सातोळी 1, शेगांव तालुका : जलंब 1, खामगांव शहर : 5 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान सुलतानपूर ता. लोणार येथील 65 वर्षीय पुरूष व बुलडाणा येथील 63 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 165 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे -  दे. राजा : 1, मेहकर : 14, नांदुरा : 15, जळगांव जामोद : 3, खामगांव :  22, शेगांव :  22, मोताळा : 15, मलकापूर : 15, संग्रामपूर : 5, लोणार : 19 , बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 22,  चिखली : 12.     

   तसेच आजपर्यंत 33246 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7059 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7059 आहे.  

  आज रोजी 668 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 33246 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7914 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7059 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 751 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 104 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

 

 

No comments:

Post a Comment