Tuesday 13 October 2020

DIO BULDANA NEWS 13.10.2020

*कोरोना अलर्ट : प्राप्त 220 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 25 पॉझिटिव्ह* *• 91 रूग्णांना मिळाली सुट्टी* बुलडाणा,(जिमाका)दि.13: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 245 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 220 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 25 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 157 तर रॅपिड टेस्टमधील 63 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 220 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे: दे. राजा तालुका : सावखेड नागरे 1, दे. मही 4, चिखली शहर: 1, चिखली तालुका : मेरा बु 1, मलकापूर तालुका : निंबारी 1, मलकापूर शहर: 1, लोणार तालुका : शारा 1, लोणार शहर: 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका: उकळी 3, हिवरा आश्रम 1, तालुका: घाटपुरी 1, खामगाव शहर: 6, नांदुरा शहर :1, संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 25 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान धाड ता. बुलडाणा येथील 45 वर्षीय पुरुष, जिजाऊ नगर, बुलडाणा येथील 55 वर्षीय पुरुष, सागवान, ता बुलडाणा येथील 35 वर्षीय पुरुष, दे. मही ता. दे. राजा येथील 73 वर्षीय पुरुष आणि जळंब ता. शेगाव येथील 91 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे 5 रुग्ण मृत पावले आहेत. तसेच आज 91 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 35, अपंग विद्यालय 10, खामगांव : 1, नांदुरा : 7, दे. राजा : 9, चिखली :1, लोणार:12, सिंदखेड राजा: 10, मेहकर : 6, तसेच आजपर्यंत 34786 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7594 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7594 आहे. आज रोजी 262 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 34786 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8117 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7594 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 412 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 111 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. ********

No comments:

Post a Comment