DIO BULDANA NEWS 31.8.2020
आदिवासी विदयार्थ्यांची एकलव्य रेसिडेशियल पब्लीक स्कुल प्रवेश परीक्षा रद्द मागील सत्रातील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होणार बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : आदिवासी विदयार्थ्यांना एकलव्य रेसीडेन्शी यल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशासाठी ची परिक्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. ही परिक्षा ऑनलाईन होणार होती ; परंतु परीक्षा रद्द करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , अकोला यां च्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जि ल्ह्या तील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा , जिल्हा परिषद , नगरपालीका प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये 5 वी , 6 वी , 7 वी , 8 वी व 9 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विदयार्थी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत . त्यांच्या मागील सत्रातील गुणाच्या आधारे विदयार्थ्यांची निवड होणार आहे. सहाव्य...