Thursday 11 June 2020

DIO BULDANA NEWS 11.6.2020

पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक योजना जाहीर
  • पुढील तीन वर्षासाठी योजनेस मान्यता
      बुलडाणा, दि. 11 (जिमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना वर्ष 2020-21 करिता जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही योजना 2021-22 व 2022-23 या वर्षांसाठी मृग बहारमध्ये लागू करण्यात आली आहे.  या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, लिंबू व चिकू या सहा फळपिकांसाठी मिळणार आहे. तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, आंबा, केळी आणि द्राक्ष या फळपिकांकरीता लागू करण्यास 5 जुन 2020 च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.  कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, जादा आर्द्रता, अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखल्या जाते.
   अधिसुचित क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. ही योजना या वर्षापासून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकासाठी ऐच्छीक आहे. या योजनेतंर्गत वास्तवदर्श दराने विमा हप्ता आकारण्यात येत असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्ता 5 टक्के अशा मर्यादेत ठेवण्यात आला आहे.  योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसुचीत फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे.  तसेच अधिसुचीत फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.  फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ राहणार आहे.
       बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीककर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपिकनिहाय आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था / बँक/ आपलेस रकार सेवा केंद्र / विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे अथवा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत मृग व आंबिया बहारासाठी वेगवेगळी आहे. मृग बहारासाठी संत्रा, पेरू, लिंबू या फळ पिकांकरिता 2020 मध्ये 20 जुन व 2011, 2022 करीता 14 जून, चिकू व मोसंबी फळपिकासाठी 30 जुन, तर डाळींब पिकाकरिता 14 जुलै राहणार आहे.
 तसेच आंबिया बहारासाठी द्राक्ष फळपिकासाठी 15 ऑक्टोंबर, मोसंबी व केळी 31 ऑक्टोंबर, संत्रा 30 नोव्हेंबर, आंबा व डाळींब 31 डिसेंबर 2020 अंतिम मुदत असणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.
                                                                विमा संरक्षीत रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता
संत्रा :  प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 80 हजार व भरावयाचा विमा हप्ता 4000 रूपये, मोसंबी :  प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 80 हजार व भरावयाचा विमा हप्ता 4000 रूपये, पेरु : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 60 हजार व भरावयाचा विमा हप्ता 3000 रूपये, डाळींब : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 30 हजार व भरावयाचा विमा हप्ता 6500 रूपये, लिंबू : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 70 हजार व भरावयाचा विमा हप्ता 3500 रूपये, केळी : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 1 लक्ष 40 हजार व भरावयाचा विमा हप्ता 7000 रूपये, द्राक्ष : प्रति हेक्टर संरक्षित विमा रक्कम 3 लक्ष 20 हजार व भरावयाचा विमा हप्ता 16000 रूपये
मृग बहारासाठी समाविष्ट महसूल मंडळ
संत्रा :  डोणगाव, हिवरा आश्रम, मेहकर, शेलगांव देशमुख, जानेफळ ता. मेहकर, अंजनी खु, सुलतानपूर ता. लोणार, आडगांव ता. खामगांव, दे.मही, अंढेरा, मेहुणा राजा ता. दे.राजा, बावनबीर, सोनाळा ता. संग्रामपूर, जामोद ता. जळगांव जा.  मोसंबी : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदूरर्जन, साखरखेर्डा ता. सिं.राजा, म्हसला बु ता. बुलडाणा, पेरू : साखळी बु ता. बुलडाणा, चिखली, चांधई, हातणी ता. चिखली, चांदुर बिस्वा, निमगांव ता. नांदुरा, पिं. काळे, जळगांव जामोद, वडशिंगी ता. जळगांव जा, डाळींब : पेठ, चिखली, चांधई, हातणी, कोलारा, अमडापूर, शेळगांव आटोळ ता. चिखली, बुलडाणा व धाड ता. बुलडाणा, शेलापूर बु, पिंप्री गवळी, पिं. देवी, मोताळा, धा. बढे, बोराखेडी ता. मोताळा, खामगांव, हिवरखेड, काळेगांव ता. खामगांव, दे.राजा, दे. मही, तुळजापूर, मेहुणा राजा, अंढेरा ता. दे.राजा, जामोद ता. जळगांव जा, नरवेल व जांबुळधाबा ता. मलकापूर. लिंबू : पि. काळे ता. जळगांव जा, शेलापूर बु ता. मोताळा, आडगांव व पारखेड ता. खामगांव.
**********
आयुर्वेद महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहण
      बुलडाणा, दि. 11 (जिमाका) :आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील आनंदीबाई शिक्षण प्रसारक मंडळ आयुर्वेद महाविद्यालय, बुलडाणा व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, साहित्यासह विलगीकरणासाठी कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहण केले आहे. सदर अधिग्रहीत केलेले संकुल ज्या वेळेस प्रशासनास आवश्यकता भासेल, त्यापूर्वी महाविद्यालयास कळविण्यात येणार आहे. या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता च्या कलम 188 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
                                                            ******
कृषि निविष्ठा सनियंत्रण कक्षाची स्थापना
      बुलडाणा, दि. 11 (जिमाका) :आपत्ती कृषि विभागातर्फे कृषि निविष्ठाच्या गुणनियंत्रण आणि पुरवठा नियंत्रण करण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना 16 मे ते 31 जुलै 2020 पर्यत करण्यात आलेली आहे. सदर कक्ष सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेर्पंत कार्यरत राहणार आहे. सदर निविष्ठा पुरवठा आणि त्याअंनुषगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारी निवारणासाठी खामगांव उपविभाग स्तरावर कृषि निविष्ठा संनियंत्रन कक्षाचा दुरध्वनी क्र. 07263- 253013 आहे. या क्रमांकावर तक्रारी नोंदविता येणार आहे. तसेच कृषि निविष्ठांच्या गुणनियंत्रण व पुरवठा नियंत्रणाकरीता तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीही स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी अध्यक्ष असून तालुका कृषि अधिकारी सदस्य, महाबीज जिल्हा व्यवस्थापक सदस्य, केविके / विद्यापीठ शास्त्रज्ञ सदस्य व पंचायत समिती कृषि अधिकारी सदस्य सचिव असणार आहे.
शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज नजीकच्या कृषि अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह द्यावा. तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज प्राप्त झाल्यास सदर अर्ज तात्काळ कृषि अधिकारी यांचेकडे हस्तांतरीत केल्या जाणार आहे, असे उपविभागीय कृषि अधिकारी, खामगांव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
                                                                                                *******
उच्च श्रेणी सहाय्यक अध्यापक पी. यु लहासे यांचेविरूद्ध प्रशासकीय कारवाई
      बुलडाणा, दि. 11 (जिमाका) :जिल्हा परिषद हायस्कूल, संग्रामपूर येथील उच्च श्रेणी सहाय्यक अध्यापक पुरूषोत्तम उखर्डा लहासे 30 डिसेंबर 2015 पासून निलंबित आहेत. ते मुख्यालयी हजर नसून त्यांचे खाते चौकशी प्रकरण अंतिम स्तरावर आहे. अंतिम कारणे दाखवा नोटीस मुख्याध्यापक जि.प हायस्कूल संग्रामपूर यांच्या मार्फत पाठविण्यात आली आहे. तसेच ते दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्यामुळे नोटीस पोच करता येत नाही. तरी खाते चौकशीच्या सुनावणी करीता शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा यांचेकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून अंतिम कारणे दाखवा नोटीस स्वीकारावी व अंतिम सुनावणीस उपस्थित रहावे. पुढील 15 दिवसात उपस्थित न राहील्यास किंवा लेखी खुलासा सादर न केल्यास श्री. लहासे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई झेड खान यांनी प्रसिद्धी प्रकटनाद्वारे कळविले आहे.
                                                                        *************
कोरोना अलर्ट : प्राप्त 64 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 06 पॉझिटिव्ह
  • सहा रूग्णांची कोरोनावर मात; मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.11 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 70 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 64 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे भिमनगर, मलकापूर येथील 62 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय तरूण, 60 वर्षीय महिला, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध, मलकापूर येथीलच 45 व 55 वर्षीय पुरूष रुग्णांचे आहे.
    त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 04 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे  त्यांना  वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. तसेच खामगांव येथील कोविड रूग्णालयातून 2 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये 36 वर्षीय पुरूष समता कॉलनी, खामगांव व 27 वर्षीय महिला पुरवार गल्ली, खामगांव येथील रूग्णाचा समावेश आहे. अशाप्रकारे 6 रूग्णांना आज सुट्टी मिळाली आहे.
   त्याचप्रमाणे बुलडाणा कोविड रूग्णालयात धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध 9 जुन 2020 रोजी दाखल झाले होते. त्याच दिवशी रात्री आयसीयुमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा कोरोना नमुना तपासणी अहवाल आज पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 04 झाली आहे.
    तसेच आतापर्यंत 1675 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 102 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी चार मृत आहे. आतापर्यंत 72 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 72 आहे.  सध्या रूग्णालयात 26 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
    तसेच आज 11 जुन रोजी 70 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 06 पॉझीटीव्ह, तर 64 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 12 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1675 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment