Tuesday 30 June 2020

DIO BULDANA NEWS 30.6.2020

अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळला
  • ओळख पटविण्याचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : एका अनोळखी इसमाचा मृतदेह भवन निवास, ढासाळवाडी तलावासमोर, ढासाळवाडी येथे आढळून आलेला आहे. या मृतकाच्या अंगावर लाल – पांढऱ्या रंगाचे चौकडीचे शर्ट, शर्टाचे आत काळ्या – भुरकट रंगाची टी शर्ट व निळ्या रंगाची कॉटन पॅन्ट घातलेली आहे. मृतकाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष आहे. याप्रकरणी ढासाळवाडी येथील पोलीस पाटील सौ. रेखा अजय शेवाळे यांनी रायपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार रायपूर पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. तरी वर नमूद वर्णन केलेल्या इसमाची ओळखीचा असल्यास त्यांनी तात्काळ रायपूर पोलीस स्टेशनला किंवा 07262-270030 क्रमांकावर संपर्क करावा,  असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून रायपूर पोलीस स्टेशनने केले आहे.
*****
                           जिल्हा ग्राहक संरक्षण परीषदेवर अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : जिल्ह्यातील ग्राहक सरंक्षण परीषदेवर रिक्त असलेल्या अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध प्रवर्गातील पात्र संस्था व व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्जाचा नमुना व पात्रतेबाबतचे निकष जिल्ह्याच्या www.buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले आहे. तरी इच्छूकांनी प्रसिद्धीच्या 30 दिवसाचे आत अर्ज सादर करावयाचे आहे.
   सदर अर्ज जिल्हा पुरवठा कार्यालय, बुलडाणा येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते सायं 6.15 वाजेपर्यंत स्वीकृत केले जाणार आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही किंवा विचारात घेतले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील अशासकीय सदस्यांची पदे भरण्यासाठी यापूर्वी काढण्यात आलेल्या सर्व जाहीरातीच्या अनुषंगाने प्राप्त झालेले सर्व अर्ज रद्द करण्यात येत आहे .नव्याने फेरप्रक्रिया राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
प्रवर्गनिहाय रिक्त पदे : जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, नगर परिषदेचे सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, पंचायत समितीचे सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य प्रवर्गातून 2 पदे रिक्त, ग्राहक संघटना / अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी प्रवर्गातून 10 पदे रिक्त, शाळा / महाविद्यालयाचे प्रतिनिधी प्रवर्गातून प्रत्येकी एक प्रमाणे 2 पदे रिक्त, वैद्यकीय व्यवसायांचे प्रतिनिधी प्रवर्गातून 2 पदे रिक्त, पेट्रोल व गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी प्रवर्गातून प्रत्येकी एक प्रमाणे 2 पदे रिक्त, व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी प्रवर्गातून प्रत्येकी एक प्रमाणे 2 पदे रिक्त आणि शेतकरी प्रतिनिधी प्रवर्गातून 2 पदे रिक्त आहेत. अशाप्रकारे 28 पदे रिक्त आहेत.
                                                            ******
सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा
बुलडाणा,(जिमाका) दि.30 : विश्वविख्यात संख्या शास्त्रज्ञ स्व. प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा सांख्यिकी कार्यालयात शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी रा. गं ढोकणे यांनी दिपप्रज्वलन  करून महालनोबिस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
   यावर्षीच्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकन्ल्पना ‘शाश्वत विकास ध्येय व कोरोना विषाणू संसर्ग’ अशी होती. या दिनानिमित्ताने राज्य व केंद्र शासनातर्फे विविध कार्यक्रमाद्वारे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. तसेच राज्याचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक रा.र शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली गुगल मिटद्वारे कार्यक्रम पार पडला. यावेळी  शाश्वत विकास ध्येय अंतर्गत आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे , लिंग समानता व स्त्रीया – मुलींचे सक्षमीकरण करणे शाश्वत विकास ध्येय -2030 हा उपक्रम राज्य स्तरावर राबविण्याकरीता संचालनालयाची राज्य शासनाद्वारे राज्य नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या विविध विभागातर्फे शाश्वत विकास ध्येय राबविण्याकरीता विविध योजनांमार्फत सदर ध्येय साध्य करण्यासाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
                                                                                ******
--

No comments:

Post a Comment