Tuesday 2 June 2020

DIO NEWS BULDANA 2.6.2020


दिलासादायक : नऊ रूग्णांना ‘डिस्जार्ज’..!
·        जळका भडंग येथील 8 व टुनकी येथील एका रूग्णाचा समावेश
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : कोरोनाच्या सावटात सध्या संपूर्ण जग आहे. देशातही कोरोनाचे लाखो रूग्ण आहेत. राज्यही 50 हजारांच्या पुढे गेले आहे. मात्र आरोग्य विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नांमुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यातही कोरोनामुक्ती प्रभावी आहे. जिल्ह्यात एकूण 42 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज खामगांव येथील सामान्य रूग्णालयातून तब्बल 9 रूग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले. यामध्ये खामगांव तालुक्यातील जळका भडंग येथील 8 व टुनकी ता. संग्रामपूर येथील एका रूग्णाचा समावेश आहे. या सर्व रूग्णांना 21 मे रोजी भरती करण्यात आले होते. डिस्जार्ज मिळालेल्या रूग्णांमध्ये 4 महिला व पाच पुरूषांचा समावेश आहे.
     जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 69 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 रूग्ण मृत आहेत. तर जळका भडंग व टुनकी येथील सदर रूग्णांसह 42 रूग्णांना कोरोनाची मागील दहा दिवसांपासून कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाय योजनांमुळे सदर रूग्ण बरे झाले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून स्वागताने घरी पाठविले. त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णही आनंदाच्या भावमुद्रेत बाहेर पडले.
    या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात येतात. कोरोना बाधित आढळलेल्या या रूग्णांना शासनाच्या निकषांनुसार वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसल्यामुळे बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर देण्यात दिला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेश टापरे उपस्थित होते.
    त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या  घरी सोडण्यात आले. सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवावे, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
                                                                              ********
‘मिशन बिगीन अगेन’ सुरूनवीन आदेश लागू
·        सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत, जिल्ह्यातंर्गत बस वाहतूक सुरू
        ·       जिल्हा ‘नॉन रेड झोन’ मध्ये, कन्टेन्टमेंट झोन बाहेर परवानगी
·        रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू
·        सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक, थुंकण्यास बंदी
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशभर 31 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले होते. परिस्थितीचा आढावा घेतनल्यानंतर राज्य शासनाने राज्यभर 30 जून 2020 पर्यंत टाळेबंदीला मुदतवाढ दिली असून राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात अधिक सवलतींसह नवीन आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लागू केले आहेत. जिल्हा सध्याही नॉन रेड झोन मध्ये असून नॉन रेड झोनमधील सर्व सवलती जिल्ह्यात लागू राहणार आहे.  सर्व दुकाने सकाळी 9 ते सायं 5 या वेळेत कंन्टेन्टमेंट झोन अर्थात प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उघडी ठेवण्यास परवानगी आहे. दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान 6 फुटाचे अंतर ठेवावे, तसेच एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये. सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, सॅनीटायझेशन या अटींसह आंतर जिल्हा बस वाहतूकीस 50 टक्के क्षमतेसह वाहतूक करण्यास परवानगी आहे.  जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. त्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, शारिरीक अंतर राखणे (किमान 6 फूट)  बंधनकारक आहे. थुंकण्यास बंदी असणार आहे.
   जिल्ह्यात या सेवांना दिली परवानगी : वैद्यकीय व्यावसायिक, नर्सेस आणि पॅरा मेडीकल स्टाफ, रूग्णवाहिका, स्वच्छता विषयक काम करणारे यांना आंतर राज्य व राज्यातंर्गत परवानगी आसणार आहे. अडकलेले मजूर, स्थलांतरीत मजूर, यात्रेकरू, श्रमिक विशेष ट्रेनने येणारे व जाणारे प्रवाशी यांना स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉलनुसार येण्या – जाण्यास परवानगी असेल. संपूर्ण मालवाहतूकीस राज्या बाहेर जाण्यास व येण्यास परवानगी असणार आहे.   
  विवाह समारंभ जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीने करता येईल, यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. विवाह समारंभामध्ये सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर व सॅनीटायझरचा वापर करावा लागेल. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींना परवानगी राहील. मनरेगाची कामे करता येतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतूक वितरण व साठवणूकीस परवानगी राहील. वस्तू व सेवांसाठी ऑनलाईन सुविधांचा वापर व घरपोच डिलीवरी देता येईल. शासनाने ठरवून दिलेल्या किमान अंतरासह महामार्गावरील ट्रक दुरूस्तीचे दुकाने सुरू राहतील. खाजगी आस्थापना, कुरीअर, पोस्टल सेवा, रेस्टॉरंटमधून होम डीलीव्हरी करण्यास परवानगी आहे. त्याचप्रमाणे एका व्यक्तीसह दुचाकी, चालकासह दोन व्यक्तींसाठी थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर वाहनांना परवानगी राहील.
   जिल्ह्यात ह्या सेवा प्रतिबंधीत असणार आहे : वैद्यकीय कारणा शिवाय किंवा या मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी, अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पुर्णपणे बंदी असेल, सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहील, सर्व सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर,  शॉपिंग मॉल, बार व तत्सम, सामुहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्प्लेक्स बंद राहतील, सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे अथवा पुजेची ठिकाणे भविकांसाठी बंद राहतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा, मेळावे आदी बंद राहतील. पानटपरी, चहाचे स्टॉल्स, उपहारगृहे, स्पा, सलून बंद राहतील.
तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रीया, 10 वर्षाखालील मुले यांनी घरातच थांबावे. केवळ अत्यावश्यक कारणास्तव परवानगी राहील.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे नियम : कामाच्या ठिकाणी हॅण्ड वॉश, सॅनीटायझर, प्रवेश व जाण्याच्या ठिकाणी ठेवावे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमित सॅनीटायझेशन, नागरिकांच्या प्रवेश ठिकाणी सर्व सुरक्षा बाळगावी. सोशल डिस्टसिंग, चेहऱ्यावर मास्क किंवा स्वच्छ रूमाल ठेवावा.
   या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,  भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
******

महाडिबीटी प्रणालीतंर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यास 6 जुन पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, (जिमाका) दि. 2 :  महाडीबीटी प्रणालीवर सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्क व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावर 1116 अर्ज प्रलंबित आहेत. सदर शिष्यवृत्ती, प्रथम हप्ता शिष्यवृत्ती , शिक्षण व परीक्षा शुल्क अर्ज महाविद्यालयास महाडीबीटी प्रणालीवर सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करण्यास 6 जुन 2020 पर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे.
  महाविद्यालय प्राचार्य यांनी अर्ज तात्काळ अंतिम तारखेपर्यंत महाविद्यालय स्तरावरील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क पात्र अर्ज समाजकल्याण कार्यालयास ऑनलाईन सादर करावे. शासनाकडून अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्ज ऑटो रिजेक्ट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाची राहील, असे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment