Tuesday 16 June 2020

DIO BULDANA NEWS 16.6.2020


अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती
  • योजनेचा लाभ घेण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 16 (जिमाका) : आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक  वर्षात परदेशात विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसुचीत जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडुन शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे साठी अर्ज मागविण्यात येत आहे.
   शिष्यवृत्तीसाठी  राज्यातील आदिवासी विदयार्थांना परदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणेसाठी अनुसुचित जमातीच्या एकुण 10 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी / अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तथापी, 10 विदयार्थांपेक्षा जास्त विदयार्थांचे अर्ज प्राप्त झाले तर विदयार्थाना त्यांनी इयत्ता 12 वी व पदवी अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणांच्याआधारे प्राधान्य देण्यात येईल.  सदर शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नमुद केलेल्या संख्येच्या प्रमाणात मंजुर करण्यात येईल. शिष्यवृत्तीसाठी संख्या निश्चित केली असली तरी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विदयार्थांना प्राधान्य देण्यात येईल. तथापी असे उमेदवार ज्या वेळी उपलब्ध होणार नाहीत, त्यावेळी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.       
      शिष्यवृत्तीस निश्चित केलेली संख्या/ क्षमता एका अभ्यासक्रमाकडुन दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी वापरली जाईल. उमेदवाराची निवड करतांना भुमीहीन आदिवासी कुटुंबातील विदयार्थी, दुर्गम भागातील विदयार्थी तसेच आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यास या शिष्यवृत्ती साठी प्राधान्य देण्यात येईल. विदयार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्यासंबधी अधिवास प्रमाणपत्र ( नॅशनॅलीटी व डोमीसीयल सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक आहे. विदयार्थी महाराष्ट्रातील अनुसुचित जमातीचा असावा. त्याबाबत सक्षम प्राधीकाऱ्याकडुन जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विदयार्थाने अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्ती साठी विदयार्थांचे वय दिनांक 01/06/2020 रोजी जास्तीत जास्त 35 वर्षापर्यत असावे.
तथापी नौकरी करीत असल्यास विदयार्थांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा ही 40 वर्षापर्यत राहिल. परंतु नौकरीत नसल्यास विदयार्थांस निवडीची वेळी प्राधान्य देण्यात येईल.
   विदयार्थांस परदेश्यातील मान्यताप्राप्त विदयापीठात प्रथमवर्षाकरीता प्रवेश मिळालेला असावा. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विदयार्थाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा जास्तीत जास्त रुपये 6,00,000/- पर्यत राहिल. त्यासंबधी सक्षम अधिकाऱ्याचे वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विदयार्थांने कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे याची माहिती आयुक्तालयास दिल्याशिवाय त्याला परदेशात जाता येणार नाही. सदर शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस ( मुलगा/मुलगी) आणि एकाच अभ्यासक्रंमास अनुज्ञेय राहिल.शिष्यवृत्ती धारक विदयार्थांने निवडलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास, अभ्यासक्रंमासाठी शासना मार्फत खर्च करण्यातआलेली संपुर्ण रक्कम त्यांचे कडुन वसूल करण्यात येईल. तसेच सदर अभ्यासक्रम पुर्ण झाल्यानंतर भारतात परत येणे किंवा किमान 5 वर्ष भारतात सेवा करणे बंधनकारक राहिल या अटी मान्य असल्यासंबधी विदयार्थाने लेखी हमीपत्र (बॉण्ड) दोन जामीनदारासह सादर करावे लागेल.
   परदेशात अभ्यासक्रमासाठी एकदा निश्चित केलेला कालावधी वाढवता येणार नाही अथवा शिष्यवृत्तीस मंजुरी घेते वेळी जो अभ्यासक्रम निवडला आहे त्यात बदल करता येणार नाही. विदयार्थाने निवडलेला अभ्यासक्रम व त्याचा कालावधी अर्जात स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम संपल्यानंतर संबधीत विदयार्थांने त्वरीत भारतात येवुन त्याचे अंतिम परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना सादर करणे आवश्यक राहील. याशिवाय सदया करीत असलेल्या व्यवसायाची माहिती दयावी.

    नौकरीत असलेल्या विदयार्थास या शिष्यवृत्तीसाठी सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्तया मार्फत सादर करणे बंधनकारक राहिल.परदेशात ज्या विदयापीठात विदयार्थांस प्रवेश मिळाला आहे त्या विदयापीठास व संस्थेस ऑनलाईन प्रणाली नुसार डायरेक्ट खात्यावर टयुशन फि जमा करण्यात येईल. तथापि, विदयार्थ्यास निर्वाह भत्ता त्याचे खात्यावर जमा करण्यात येईल. शिष्यवृत्ती साठी निवड झालेल्या विदयार्थ्यांस , परदेशातील निवास हा अभ्यासक्रमाचा कालावधी पलीकडे कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार नाही. संबधीत विदयार्थ्याने अगोदरच्या वर्षाचे गुणपत्रक , विदयापिठ फी व निवास फी अदा केल्याबाबत प्रमाणित प्रत दिल्यानंतरच पुढिलवर्षाची शिष्यवृत्ती आयुक्त, आदिवासी विकास हे मंजुर करतील. अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यावर परदेशातील वास्तव्यासाठी कोणताही पत्रव्यवहार आयुक्तालयामार्फत केला जाणार नाही अथवा त्यासाठी कोणताही जादा निधी मंजुर केला जाणार नाही. परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी विदयार्थ्याची निवड झालेली आहे त्या देशाचे पारपत्र (व्हिजा) प्राप्त करण्याची जबाबदारी संबधीत विदयार्थ्याची राहिल. यासाठी राज्य अथवा केंद्रशासनाचे अर्थसहाय्य मंजुर होणार नाही.
     ज्या अभ्यासक्रमासाठी विदयार्थी प्रवेश घेणार आहे. त्याच अभ्यासक्रमासाठी फी अनुज्ञेय राहिल, इतर कोणत्याही अनुषगीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश व फी अनुज्ञेय राहणार नाही. शिष्यवृत्तीसाठी विदयार्थ्याने अर्जासोबत चुकिची माहिती अथवा खोटे कागदपत्र सादर केल्याचे आढळून आल्यास अशा विदयार्थ्याकडून शिष्यवृत्ती पोटी शासनाने केलेला संपुर्ण खर्च शेकडा 15 टकके व्याजासह वसूल करण्यात येईल. तसेच सदर विदयार्थ्याचे नाव काळया यादीत टाकण्यात येईल. परदेशी विदयापिठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE(Graduate Record Examination) तसेच TOFEL ( Test of English as a Foreign Language) / IELTS (International English Language Testing System) या प्रवेश परिक्षा घेतल्या जातात. सदर GRE च्या आधारावर प्रवेश घेणा-या व TOFEL/ IELTS उत्तीर्ण असणा-या विदयार्थ्यांचा विशेष विचार करण्यात येईल. ज्या परदेशी विदयापिठाचे जागतिक रँकिंग (Latest QS World Raking ) 300 पर्यंत आहे अशाच
विदयापिठात प्रवेश मिळालेले विदयार्थी या योजनेसाठी पात्र राहतील मात्र निवड मेरिटनुसारच होईल.  
    विदयार्थ्यास शिक्षण फी, परिक्षा फी,निर्वाह भत्ता(निवास व भोजन) शैक्षणिक कॉन्टेजन्सी चार्जेस हे लाभ देण्यात येतील.
विमान प्रवास , विजा फी , स्थानिक प्रवास भत्ता, विमा, संगणक, लॅपटॉप व आयपॅड व इतर सुविधांचा खर्च विदयार्थ्यास स्वखर्चाने करावा लागेल. नोकरीत असलेल्या विदयार्थ्यास या शिष्यवृत्तीस सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्त्यामार्फत सादर करणे बंधनकारक राहिल. परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी विदयार्थ्याची निवड झालेली आहे त्या देशाचे पारपत्र (व्हिजा) व पासपोर्ट प्राप्त करण्याची जबाबदारी संबधीत विदयार्थ्याची राहिल. यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार नाही. परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे त्या विदयापिठाचे पत्र व संबधित विदयापिठाचे प्रॉस्पेक्टस ची प्रत अभ्यास क्रमासाठी शैक्षणिक शुल्कासह येणा-या एकुण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र परदेशात ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाशी संबधीत असलेल्या शाखेतील /विभागातील शिफारस पत्र (Reference) शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणेसाठी विहित नमुन्यातील आवेदन पत्र (अर्ज) प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला या कार्यालयात कार्यालयीत वेळेत विनामुल्य उपलब्ध आहे.
   शिष्यवृत्ती लाभ घेवू इच्छिणा-या विदयार्थी व विदयार्थीनी वर नमुद कार्यालयातून विहित नमुन्यात शिष्यवृत्तीसाठी नमुना अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतींसह अर्ज अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात दिनांक 25 जून 2020 पर्यंत सादर करावा. दिनांक 25 जून 2020 नंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही, असे प्रकल्प अधिकारी, यांनी कळविले आहे.
अभ्यासक्रमाचे नाव, स्तर व एकूण संख्या
 एमबीए : पदव्युत्तर स्तरासाठी पदव्युत्तर 2 विद्यार्थी, वैद्यकीय अभ्यासक्रम : पदवीसाठी एक व पदव्युत्तरसाठी एक असे 2 विद्यार्थी, बीटेक (अभियांत्रिकी) : पदवी स्तराकरीता एक व पदव्युत्तर स्तरासाठी एक असे दोन विद्यार्थी,  विज्ञान : पदव्युत्तर स्तर 1  विद्यार्थी, कृषि :  पदव्युत्तर स्तर 1 विद्यार्थी, इतर विषय : पदव्युत्तर स्तराकरीता दोन विद्यार्थ्यांना अशाप्रकारे 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.  
********



                    क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याकरीता 20 जूनपर्यंत मुदत वाढ
  • माध्यमिक/उच्च माध्यमिक परिक्षेत प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांसाठी सवलत
 बुलडाणा, दि. 16(जिमाका):माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या/सहभागी झालेल्या खेळाडु विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यासंदर्भात शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे.  सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे.  या शासन निर्णयान्वये, राज्यात उद्भवलेल्या कोवीड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कोणताही संबंधीत खेळाडू क्रीडा गुण सवलतीपासुन वंचीत राहु नये,  या उदात्त हेतुने क्रीडा गुण सवलतीचे परिपुर्ण प्रस्ताव द्वि-प्रतीत, शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी 20 जून 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेकडे सादर करावे,  असे  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त 3 कोरोना अहवाल 'पॉझीटीव्ह'; तर 1 निगेटीव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 4 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे जळगांव जामोद येथील 56 वर्षीय पुरूष, बहापूरा ता. मलकापूर येथील 24 वर्षीय महिला व डोणगांव, ता. मेहकर येथील 20 वर्षीय महिला रूग्णाचे आहेत.  डोणगांव येथील महिला रिसोड जि. वाशिम येथून आली असून सदर महिलेचा स्वॅब रिसोड येथे पॉझीटीव्ह आला आहे.  आतापर्यंत 81 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 81 आहे.  सध्या रूग्णालयात 47 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्‍ आहे.
  तसेच आतापर्यंत 1873 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 133 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 16 जुन रोजी 4 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 3 पॉझीटीव्ह, तर 1 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  25 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1873 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******






No comments:

Post a Comment