Saturday 27 June 2020

DIO BULDANA NEWS 27.6.2020

केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स सशर्त सुरु करण्यास परवानगी
·          जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
·        प्रतिबंधीत क्षेत्रात परवानगी नाही
बुलडाणा, दि.27 (जिमाका): जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी  दिले आहेत.
     दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. 
  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 1 जुन 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 जून 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.  या आदेशामध्ये केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटीपार्लर्स प्रतिबंधित करण्यात आलेली होती.  मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 25 जून 2020 आदेशामध्ये केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत जिल्ह्यात दिनांक 28  जुन 2020 पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जिल्ह्यातील  केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स खालील अटी व शर्तींना अधिन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार  सलून्स, ब्युटी पार्लर व केशकर्तनालये यामध्ये केवळ निवडक सेवा जसे की, केस कापणे, केसांना रंग (डाय) करणे, वॅक्सींग, थ्रेडींग आदी सेवांनाच परवानगी असेल. त्वचेशी संबंधित सेवांना परवानगी असणार नाही. या सेवा दिल्या जाणार नाहीत असा फलक दुकानामध्ये दर्शनी भागामध्ये सर्वांना दिसेल असा लावण्यात यावा.
  दुकान, ब्युटी पार्लर चालक / कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने जसे की, हातमोजे (हॅन्ड ग्लोव्हज), ॲप्रन व मास्क वापरणे बंधनकारक असेल. ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनीटज्ञईज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर दोन तासांनी सॅनीटाईज करणे बंधनकारक असेल.     
   टॉवेल, नॅपकीन्स यांचा वापर एका ग्राहकासाठी एकाचवेळी करणे बंधनकारक राहील.  दुसऱ्या ग्राहकासाठी त्याचा वापर करण्यात येवू नये. . नॉन डिस्पोजेबल साधने प्रत्येक वापरानंतर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. प्रत्येक दुकानात ग्राहकांच्या माहितीसाठी वरील सर्व खबरदारीच्या सूचना दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. शहरी भागात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पाहणी करून आदेशाचे पालन होत नसल्यास संबंधीतांवर तात्काळ शॉप ॲक्ट व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कार्यवाह करावी व परवाना रद्द करावा.  उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही यात म्हटले आहे.
*****************
                   



            कोरोना अलर्ट : प्राप्त 50 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 15 पॉझिटिव्ह
  • एका रूग्णाची  कोरोनावर मात
बुलडाणा,(जिमाका) दि.27 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांव बढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे धा. बढे येथे 6 रूग्ण आढळले आहे.
    तसेच  मोहनपुरा मलकापूर येथील 30 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरूण, 37 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष, मँगो हॉटेल, मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष, घासलेटपुरा नांदुरा येथील 6 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरूष व दाल फैल खामगांव येथील 75 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे 15 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
  तसेच आज 1 रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्याला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये चाळीस बिघा मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 2418 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 139 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 139 आहे.  तसेच आज 27 जुन रोजी 68 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 15 पॉझीटीव्ह, तर 50 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 101 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2418 आहेत.
      जिल्ह्यात आजअखेर एकूण 198 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 139 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 48 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment