Monday 22 June 2020

DIO BULDANA NEWS 22.6.2020

कोरोना अलर्ट : प्राप्त 83 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 08 पॉझिटिव्ह
  • 08 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 83 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे धामणगांव बढे ता. मोताळा येथील 22 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 5 वर्षाची मुलगी व 65 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच मलकापूर येथील 52 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय वृद्ध महिला, नांदुरा येथील 37 वर्षीय महिला व समर्थ नगर खामगांव येथील 53 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तसेच मलकापूर येथील 19 जुन 2020 रोजी दाखल 52 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला होता. सदर मयत रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्याची मृत्यूसंख्या 8 झाली आहे.
    जिल्ह्यामध्ये मलकापूर व संग्रामपूर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, दे.राजा, चिखली व बुलडाणा तालुक्यात सध्या एकही क्रीयाशील कोरोना रूग्ण नसल्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त आहे. मलकापूर येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची संचारबंदी पाळण्यात येत आहे.
   त्याचप्रमाणे आज 08 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार त्यांना आज सुट्टी देण्यात आली. शेगांव कोविड रूग्णालयातून पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 22 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच खामगांव कोविड रूग्णालयातून चिखली, ता. खामगांव येथील 25 वर्षीय पुरूष रूग्णाला डिस्जार्ज देण्यात आला. तर बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून भीमनगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय तरूण, 60 वर्षीय पुरूष आणि 9 वर्षीय मुलाला सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आठ रूग्णांनी आज कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
       तसेच आतापर्यंत 2254 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 165 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी आठ मृत आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 122 आहे.  सध्या रूग्णालयात 35 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.
    तसेच आज 22 जुन रोजी 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 08 पॉझीटीव्ह, तर 83 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 12 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2254 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
                                                ******
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,(जिमाका) दि‍ 22 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जुलै 2020 चे नियतनातील प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजने करीता गहू व तांदूळ धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो,  तर परिमाण प्रति लाभार्थी 3 किलो गहू व तांदूळ 2 किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 4342 क्विंटल व तांदूळ 2894 क्विंटल, बुलडाणा : गहू 5113  क्विंटल व तांदूळ 3408,  दे.राजा गोदामाकरीता गहू 2124 तांदूळ 1416, अमडापूर : गहू 1412 क्विंटल व तांदूळ 941, मोताळासाठी गहू 3010 क्विंटल व तांदूळ 2006, नांदुरासाठी गहू 3049 क्विंटल व तांदूळ 2033, खामगांव गोदामकरीता गहू 5558 व तांदूळ 3705, शेगांवकरीता गहू 2676 व तांदूळ 1784, जळगांव जामोदकरीता गहू 2795 व तांदूळ 1863, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2600 व तांदूळ 1733,  मेहकरसाठी गहू 3785 व तांदूळ 2524 , लोणारकरीता गहू 2514 व तांदूळ 1676, सिंदखेड राजाकरीता गहू 1696 क्विंटल व तांदूळ 1130,  मलकापूर : गहू 3069 व तांदूळ 2046, साखरखेर्डा गहू 1287 व तांदूळ 858 आणि डोणगांव करीता गहू 1340 क्विंटल व तांदूळ 893 असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 46370 क्विंटल व तांदूळ 30910  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
********
अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,(जिमाका) दि‍ 22 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत जुलै 2020 चे नियतनातील अंत्योदय लाभार्थी योजनेकरीता गहू व तांदूळ धान्याची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 30 जुन 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये व तांदूळ 3 रूपये प्रतिकिलो,  तर परिमाण प्रति कार्ड 20 किलो गहू व तांदूळ 15 किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 681 क्विंटल व तांदूळ 512 क्विंटल, बुलडाणा : गहू 1392  क्विंटल व तांदूळ 1043,  दे.राजा गोदामाकरीता गहू 567 तांदूळ 426, अमडापूर : गहू 232 क्विंटल व तांदूळ 175, मोताळासाठी गहू 1169 क्विंटल व तांदूळ 876, नांदुरासाठी गहू 1209 क्विंटल व तांदूळ 907, खामगांव गोदामकरीता गहू 1002 व तांदूळ 751, शेगांवकरीता गहू 606 व तांदूळ 454, जळगांव जामोदकरीता गहू 1005 व तांदूळ 753, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 1210 व तांदूळ 907, मेहकरसाठी गहू 841 व तांदूळ 631 , लोणारकरीता गहू 1293 व तांदूळ 969, सिंदखेड राजाकरीता गहू 555 क्विंटल व तांदूळ 417,  मलकापूर : गहू 904 व तांदूळ 678, साखरखेर्डा गहू 309 व तांदूळ 231 आणि डोणगांव करीता गहू 265 क्विंटल व तांदूळ 200 असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 13240 क्विंटल व तांदूळ 9930  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.



No comments:

Post a Comment